PHOTO : कपिल शर्माच्या नव्या फोटोनं फॅन्सच्या चिंतेत भर

काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर दिसलेला कपिलचं वजन वाढलेलं दिसत होतं... 

Updated: Aug 8, 2018, 04:48 PM IST
PHOTO : कपिल शर्माच्या नव्या फोटोनं फॅन्सच्या चिंतेत भर   title=

मुंबई : एकेकाळचा 'कॉमेडी किंग' आज स्वत:च हास्यास्पद ठरतोय... कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्मा गेल्या कित्येक महिन्यांपासून टीव्ही स्क्रीनवरून गायब झालाय... एकेकाळी सोशल मीडियावर भरभरून प्रेम मिळत असलेला कपिल आज मात्र सोशल मीडियावर काहीही शेअर करायला कचरतोय... काही दिवसांपूर्वी मुंबई एअरपोर्टवर दिसलेला कपिलचं वजन वाढलेलं दिसत होतं... उतरती कळा लागलेल्या कपिलचा हा फोटो खूपच बोलका होता... त्याच्या अनेक चाहत्यांनी या फोटोनंतर हळहळ आणि सहानुभूती व्यक्त केली होती.

आता कपिलचा आणखीन एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. कपिल शर्माच्या फॅन क्लबनं ट्विटरवरून हा फोटो शेअर केलाय. या फोटोत कपिलसोबत त्याचा मित्र 'चिकू'ही दिसतोय. कपिल आजही पुरता सावरलेल्या स्थितीत नाही हे त्याचे दाढीचे वाढलेले खुंट सांगत आहेत. 


कपिल 'चिकू'सोबत

कपिल कॅमेऱ्याकडे पाहून स्मितहास्य करीत असलेला दिसला तरी तो मनापासून मनमोकळेपणानं मात्र हसताना दिसत नाही... आणि त्याच्या चाहत्यांना हे जाणवतंय. 

काही दिवसांपूर्वी कपिलनं आपण नैराश्येतून जात आहोत... आणि यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहोत, असं मान्य केलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार, सध्या कपिल युरोपमध्ये आहे.