नवी दिल्ली : कॉमेडियन कपिल शर्माचा दुसरा चित्रपट 'फिरंगी' प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यामुळे सध्या कपिल चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. तब्बेत ठीक नसल्यामुळे कपिल शर्मा लाईमलाईट पासून काही काळ दूर होता. आता मात्र तो पुन्हा अॅक्टिव्ह झाला आहे आणि चित्रपटाच्या प्रमोशनला जोरदार सुरुवात केली आहे.
अलीकडेच आपल्या चित्रपटाला सफलता मिळावी म्हणून आशीर्वाद घेण्यासाठी कपिल चक्क शिर्डीच्या साईबाबांचरणी लीन झाले. तेव्हा त्याच्यासोबत त्याची गर्लफ्रेंड गिन्नी देखील होती. दोघांनी साईबाबांचे दर्शन घेतले. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिलने 'सारेगामापा' मध्ये देखील हजेरी लावली होती. फिरंगी हा कपिल शर्मा प्रॉडक्शनचा पहिला चित्रपट आहे. त्यामुळे कपिलसाठी तो अत्यंत खास आहे.
चित्रपटाची कथा स्वातंत्रपूर्व काळातील आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. त्यात कपिलचा अंदाज अनेकांना भावला. हा चित्रपट १० नोव्हेंबरला प्रदर्शित होईल.