कपिल शर्माचा 'फिरंगी' १० नोव्हेंबरला रसिकांंच्या भेटीला

कॉमेडीयन कपिल शर्मा आजारी असल्याने त्याचा सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध शो बंद झाला.

Updated: Sep 26, 2017, 06:05 PM IST
कपिल शर्माचा 'फिरंगी' १० नोव्हेंबरला रसिकांंच्या भेटीला title=

मुंबई : कॉमेडीयन कपिल शर्मा आजारी असल्याने त्याचा सोनी टीव्हीवरील प्रसिद्ध शो बंद झाला.

त्यानंतर आरोग्याकडे लक्ष देण्यासाठी काही काळ सारे काम थांबवून कपिलने औषधोपचार केले. 40 दिवसांचे आरोग्य शिबीर 12 दिवसांतच संपवून कपिल पुन्हा फीट अ‍ॅन्ड    फाईन झाला आहे. 

नुकताच तो चार महिन्यानंतर  जीममध्येही आला. 'बराच वेळ घरी बसून कंटाळा आला. आता जीमचेही पैसए वाया जात होते म्हणून जीममध्ये परत आलो आहे. असे त्याने सांगितले.  कपिलने त्याच्या फॅनसाठी खास फेसबुक लाईव्हदेखील केले. यामध्ये त्याने चाहत्यांना लवकरच परत येत असल्याची माहिती दिली.  

ऑक्टोबर महिन्यापासून कपिल शर्मा त्याच्या आगामी चित्रपटाच्या 'फिरंगी' च्या प्रमोशनमध्ये दिसणार आहे. 10 नोव्हेंबरला फिरंगी रसिकांच्या भेटीला येणार आहे. गाणी आणि चित्रपट  पाठोपाठ रिलीज होणार आहे. पण या फेसबुक लाईव्हमध्ये कपिलच्या शो बद्दल त्याने कोनतीच माहिती दिली नाही.