कपिल शर्माचं सिद्धू सोबत नेमकं काय घडलं?

कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा पुन्हा एकदा भांडणावरून चर्चेत होता. नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासोबत देखील कपिलचा वाद झाला होता. पण अखेर या मुद्यावरून पडदा उठला आहे. 

Dakshata Thasale दक्षता ठसाळे - घोसाळकर | Updated: Aug 21, 2017, 07:43 PM IST
कपिल शर्माचं सिद्धू सोबत नेमकं काय घडलं?  title=

नवी दिल्ली : कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा पुन्हा एकदा भांडणावरून चर्चेत होता. नवज्योत सिंह सिद्धू यांच्यासोबत देखील कपिलचा वाद झाला होता. पण अखेर या मुद्यावरून पडदा उठला आहे. 

सिद्धू काही दिवस कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा शो मधून ब्रेक घेत आहे. तर काही दिवस ते शोमध्ये दिसणार नाही आहेत. कपिलने त्या पुढे सांगितले की, या अगोदर देखील सिद्धू शोमधून ब्रेक घेत असतं. त्यामुळे या अफवांमध्ये काहीच खरं नाही आहे, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं आहे. 

कपिलने सांगितलं की असं या अगोदर देखील झालं आहे. जेव्हा सिद्धू नसताना देखील शोचं शुटिंग झालेलं आहे. उदाहरणार्थ कपिलने सांगितले की, सैराटचे स्टारकास्ट जेव्हा आले होते तेव्हा सिद्धू शोमध्ये नव्हते. तसेच जेव्हा जॅकी जॅन आले होते तेव्हा सिद्धूंच्या जागी आम्ही रवीना टंडन यांना बसवले होते. मी या सगळ्या गोष्टी वाचल्या पण आता सिद्धू सरांशी माझं कोणतंही बोलणं झालेलं नाही. तसेच या सर्व बातम्या खोट्या आहेत. 

कपिल शर्मा आणि सिद्धू हे बऱ्याच वर्षांपासून एकत्र आहेत. जेव्हा कॉमेडी नाईट विथ कपिल हा शो येत होता तेव्हाही हे दोघे एकत्र होते. आणि जेव्हा त्यांचा शो सोनी टिव्हीवर येत आहे. तेव्हा देखील हे दोघे एकत्र आहेत.