नैराश्याने त्रस्त कपिल शर्मा घेतोय अक्षय कुमारची मदत

कपिलही अक्षय कुमारच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतोय. 

Updated: Sep 23, 2018, 01:39 PM IST
नैराश्याने त्रस्त कपिल शर्मा घेतोय अक्षय कुमारची मदत  title=

मुंबई : नैराश्याने त्रस्त असलेला कपिल शर्मा पुन्हा एकदा मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करतोय. आपल्या कॉमिक पर्सनालिटीने सर्वांना हसवून लोटपोट करणारा कपिल पुन्हा एका घराघरात दिसणार आहे. कपिल शर्माला नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी अक्षय कुमार मदत करतोय असं सांगितलं जातंय. कपिल शर्मा या फेजमधून बाहेर पडण्यासाठी खिलाडी अक्षय कुमारच्या कामातून प्रेरणा घेतोय.

असं ट्वीट

कपिलने स्वत:च ट्विट करुन यासंदर्भात माहिती दिली. 'चला, बाय, झोपायची वेळ झाली. गुड नाईट. सध्या अक्षय कुमार पाजींना फॉलो करतोय.'

अक्षयपासून प्रेरणा 

अक्षय कुमार अभियानयाइतकाच आपल्या फिटनेससाठीही ओळखला जातो. त्याच्या खाण्या-पिण्याच्या वेळा, व्यायामाच्या वेळा ठरलेल्या असतात. तो त्याच्या टाईम टेबलचा परफेक्ट आहे. यासोबत तो कधी तडजोड करत नाही. कपिल देखील अक्षयकडून हेच धडे घेतोय. अक्षयचा फिटनेस आणि हॅंडसम पर्सनालिटी इंडस्ट्रीमध्ये अनेकांना प्रेरणा देत असते. त्यामुळे कपिलही त्याच्या पावलावर पाऊल टाकताना दिसतोय.