कपिल शर्माची छोट्या पडद्यावर होणार पुन्हा वापसी

कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्या आगामी चित्रपटात सध्या व्यस्त आहे. फिरंगीमध्ये तो लवकरच झळकणार आहे. सध्या कपिल आपल्या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. 

Updated: Nov 18, 2017, 05:06 PM IST
कपिल शर्माची छोट्या पडद्यावर होणार पुन्हा वापसी title=

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा त्याच्या आगामी चित्रपटात सध्या व्यस्त आहे. फिरंगीमध्ये तो लवकरच झळकणार आहे. सध्या कपिल आपल्या सिनेमाचं प्रमोशन करत आहे. 

कपिल प्रत्येक ठिकाणी आपल्या चित्रपटाचं प्रमोशन करतांना दिसत आहे. दुसरीकडे, कपिलच्या चाहत्यांना त्याच्या छोट्या पडद्यावर येण्याची प्रतिक्षा आहे. पण अशा चाहत्यांसाठी एक खूशखबर आहे. कपिल पुन्हा छोट्या पडद्यावर येत आहे.

कपिल आपला शेवटचा शो, द कपिल शर्मा शोमधून परत येत आहे. अलीकडे, सोनी टीव्ही आणि निर्मात्यांच्या वतीने, असे म्हटले जाते की कपिल शर्मा आपल्या जुन्या शोमधूनच परत येऊ शकतो.

सध्या कपिल आपल्या चित्रपटाच्या रिलीज होण्य़ाची वाट बघत आहे. कपिलला चित्रपटातून खूप अपेक्षा आहेत. कपिलचा हा सिनेमा किती चालतो हे पाहावं लागेल.