विनोदवीर कपिल शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन

2019मध्ये कपिलच्या घरात मुलीने जन्म घेतला आणि आता...

Updated: Feb 1, 2021, 02:37 PM IST
विनोदवीर कपिल शर्माच्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन title=

मुंबई : विनोदवीर कपिल शर्माच्या घरी एका नव्या गोंडस पाहुण्याचं आगमन झालं आहे. कपिल शर्मा आणि गिन्नी चतरथ यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाली आहे. खुद्द कपिलने सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलगा झाल्याची आनंदाची बातमी शेअर केली. कपिलने सोशल मीडियावर ही आनंदाची बातमी शेअर केल्यानंतर चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. २०१९मध्ये कपिलच्या घरात एका गोड मुलीचं आगमन झालं. आता त्याच्या घरी गोंडस मुलगा आल्यामुळे कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण आहे. 

कपिल ट्विट करत म्हणाला की, 'आज सकाळी आमच्या घरी मुलाचं आगमन झालं आहे. बाळ आणि आई दोघांचा प्रकृती स्थिर आहे. तुम्ही दिलेलं प्रेम आणि शुभेच्छांचे आभारी आहोत.' दरम्यान , काही दिवसांपुर्वी विनोदवीर कपिल शर्माचा 'द दपिल शर्मा शो' लवकरच बंद होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होता. 

प्रेक्षकांच्या प्रश्नांना आणि चर्चांना खुद्द कपिलने पूर्णविराम दिला. गिन्नी त्यांच्या दुसऱ्या बाळाला जन्म देणार होती. म्हणून कपिलने महत्त्वाच्या वेळी पत्नीसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे 'द कपिल शर्मा शो' काही दिवस शो बंद राहणार आहे. 

शोच्या सुरूवातीला कलर्स वाहिनीच्या माध्यमातून हा शो प्रेक्षकांना अनुभवता येत होता. त्यानंतर कपिलने सोनी टीव्हीची वाट धरली. मध्यंतरी सुनील ग्रोवरसोबत झालेल्या भाडणांमुळे देखील शो काही काळ बंद होता. त्यानंतर जुनी टीम आणि नवीन कलाकारांसोबत कपिलने हिंमत न हारता शो पुन्हा सुरू केला. आता पुन्हा काही दिवसांनंतर शो नव्या अंदाजात प्रेक्षकांना पाहता येणार आहे.