Kantara : 28 वर्षांपासून सुरू होती तयारी, शाळेतही हाच विचार करायचा ऋषभ; उगाच नाही मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

70 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ऋषभ शेट्टीला 'कंतारा'साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.  

सोनेश्वर पाटील | Updated: Aug 16, 2024, 03:40 PM IST
Kantara : 28 वर्षांपासून सुरू होती तयारी, शाळेतही हाच विचार करायचा ऋषभ; उगाच नाही मिळाला राष्ट्रीय पुरस्कार title=

Kantara : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च पुरस्कार मानला जाणारा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आज जाहीर झाला आहे. यावेळी दिग्दर्शक-अभिनेता ऋषभ शेट्टीला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवडण्यात आले आहे. 'कांतारा' सारखा ब्लॉकबस्टर हिट चित्रपट 2022 मध्ये दिला गेला. या चित्रपटात ऋषभ शेट्टीने दमदार अभिनय केला आहे.

ऋषभ शेट्टीने साकारलेली पात्रे पाहून चाहते देखील नेहमी थक्क होतात. प्रेक्षकांना त्याच्या परिचयाची गरज नाही असे म्हटले तरी चुकीचे ठरणार नाही. कारण त्याच्या खास शैलीने लोकांना नेहमीच त्यांच्या कलेचे वेड लावले आहेत. मनोरंजन क्षेत्रात देखील त्याने स्वत: ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने लहानपणापासूनच करिअरला सुरुवात केली आहे. सहावीत असताना उद्योगाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. तेव्हापासून ते यशगानाचे कट्टर अनुयायी झाला. 

ऋषभ शेट्टी म्हणाला की, कलाकार म्हणून माझा प्रवास सहावीपासून सुरु झाला. जेव्हा मी यक्षगान केले. तेव्हापासून माझ्या परिसरातील लोककथा लोकांना दाखवण्याचे माझे स्वप्न होते. ऋषभ शेट्टीने कांतारा: द लिजेंड या चित्रपटात जगभरातील लोककथा नृत्याचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे.

कांतारा येथील नृत्य वराहरुपम या ट्रॅकमध्ये समाविष्ट करण्यात आला होता. त्यांनी ते अॅमेझॉन प्राइम व्हिडीओ कार्यक्रमात ते थेट सादर केले होते. 16 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या 'कांतारा'ने बॉक्स ऑफिसवर 450 कोटींची कमाई केली होती. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे . 'कंतारा'च्या यशानंतर ऋषभने 'कंतारा'च्या सिक्वेलची घोषणा केली होती. हा चित्रपट पुढील वर्षी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

'कांतारा' चित्रपटाची निर्मिती Homble Films ने केली. कांताराच्या सिक्वेलमध्ये ऋषभ शेट्टी पुन्हा एकदा अभिनेता आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट पूर्वीपेक्षा मोठा असणार आहे. या चित्रपटाची चाहते देखील आतुरतेने वाट पाहत आहेत. सध्या या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे.