संपूर्ण जग सामावून घेण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे - कंगना रानौत

कंगनाने घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत कलाविश्वात नव्याने येवू पाहणाऱ्या कलाकारांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य केलं.  

Updated: Aug 21, 2020, 09:23 AM IST
संपूर्ण जग सामावून घेण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे - कंगना रानौत  title=

मुंबई : कायम वादाचा मुकूट आपल्या डोक्यावर घेवून मिरवणारी अभिनेत्री कंगना रानौत नेहमी आपले परखड आणि स्पष्ट मत मांडत असते. अनेक सामाजिक, राजकीय किंवा इतर अन्य विषयांवर ती वक्तव्य करत असते. सध्या ती दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबद्दल अधिक तिव्र होताना दिसली. आता देखील तिने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करत सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे. १५ वर्ष अभिनय क्षेत्रात काम करत असताना अनेकांनी तिला सोशल मीडियावर सक्रिय होण्याचा सल्ला दिला. व्हिडिओ शेअर करत तिने कॅप्शनमध्ये 'माझ्या ट्विटर कुटुंबासाठी' असं लिहिलं आहे.

ट्विटरवर ती एक व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'कलाविश्वात मला १५ वर्ष झाली आहेत. त्यामुळे अनेकांनी सोशल मीडियावर येण्यासाठी दबाव टाकला. पण मला कधी असं वाटलं नाही की मी माझ्या चाहत्यांपासून लांब आहे. कारण मी एक कलाकार आहे आणि मला जे  काही माझ्या चाहत्यांना सांगायचं आहे, ते मी चित्रपटांच्या माध्यमातून सांगते.' 

पुढे ती म्हणाली, आज मी सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे. संपूर्ण जग सामावून घेण्याची ताकद सोशल मीडियामध्ये आहे. त्यामुळे आपल्याला सुशांतसाठी एकत्र येवून लढायचं आहे. यात आपल्याला यश देखील मिळालं आहे. असं म्हणत तिने सोशल मीडियावर पदार्पण केलं आहे. 

दरम्यान कंगनाने घराणेशाहीचा मुद्दा पुढे करत कलाविश्वात नव्याने येवू पाहणाऱ्या कलाकारांवर अन्याय होत असल्याचं वक्तव्य केलं. सुशांतने देखील बॉलिवूडमधील घराणेशाहीला बळी पडून आपलं जीवन संपवलं असल्याचं ती सोशल मिडियाच्या माध्यमातून वारंवार सांगत आहे. 

कंगनाच्या या वादग्रस्त भूमिकेमुळे अनेक कलाकारांनी तिचा विरोध देखील केला. सुशांतच्या आत्महत्येनंतर दिग्दर्शक करण जोहर, अभिनेता सलमान खानवर सडकून टीका केली.  तर आता सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहेन