Emergency : सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने अभिनेत्री कंगना रणौतच्या 'इमर्जन्सी' चित्रपटाला प्रदर्शित करण्यासाठी परवानगी दिली आहे. मात्र, कंगना रणौतला 'इमर्जन्सी' चित्रपटातील 13 सीनमध्ये बदल करावा लागणार आहे. ज्यामध्ये शीख गटांनी त्यांच्या समाजाचे चुकीचे चित्रण केल्याचा आरोप केला होता.
कंगनाच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटात एका बससमोर शीख नसलेल्यांच्या गटावर गोळीबार करतानाचा सीन आहे. ज्यावर शीख समाजाने आक्षेप घेतला होता. ज्यामध्ये त्यावेळच्या वाढत्या फुटीरतावादी खलिस्तान चळवळीतील प्रमुख व्यक्तिमत्व जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांच्याशी संवाद साधण्यापर्यंतची यादी आहे. हे सीन कट करून चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. असं सेन्सॉर बोर्डाने उच्च न्यायालयामध्ये सांगितले आहे.
कोणते आहेत ते सीन?
1. CBFC च्या समितीने चित्रपटाच्या सुरुवातीला एक अस्वीकरण समाविष्ट करण्यास सांगितले आहे. ते म्हणाले की, आम्ही प्रेक्षकांना हे स्पष्ट करू इच्छितो की, ही घटनांची नाट्यमय आवृत्ती आहे. जेणेकरून तेथे सादर केलेली प्रत्येक गोष्ट परिपूर्ण सत्यासाठी घेतली जाणार नाही. असे एका सूत्रान सांगितले.
2. चित्रपटाच्या सुरुवातीला पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी आसामला भारतापासून तोडले आहे. या वस्तुस्थितीचा इशारा देताना ऐकले आहे. बोर्डाने चित्रपट निर्मात्यांना या माहितीचा वास्तविक स्त्रोत दाखवण्यास सांगितले आहे.
3. त्यानंतर चित्रपटात 1 तास 52 मिनिटांनी भिंद्रनवाले संदय गांधींना तुमच्या पक्षाला मते हवी आहेत, आम्हाला खलिस्तान हवा आहे. असे म्हणताना ऐकू येत आहे. त्यामुळे सीबीएफसीने हा संवाद कट करण्यास सांगितले आहे. कारण भिंद्रनवालेने संजय गांधींसोबत करार केला होता. तसेच चित्रपट निर्मात्यांना या दाव्याचे समर्थन करण्यासाठी स्त्रोत प्रदान करण्यास सांगितले आहे.
4. त्याचबरोबर भिंद्रनवाले यांचे नाव कमीतकमी तीन सीनमधून काढून टाकण्यासाठी सुचवले आहे. ज्यामध्ये भिंद्रनवालेचे पात्र सीनमध्ये नाही पण इतर व्यक्तींमधील संभाषणात नावाची चर्चा केली जात आहे. त्यामुळे ज्या संभाषणामध्ये त्याचे नाव आहे ते हटवण्याची बोर्डाने विनंती केली आहे.
5. बोर्डाने चित्रपट निर्मात्यांना चित्रपटात 2 तास 11 मिनिटांच्या एका दृश्यात शीखांनी बिगर शीखांवर केलेला हिंसाचार कमी करण्यास सांगितले आहे. ज्यामध्ये शीख बससमोर बिगर शीखांचे शूटिंग करताना दिसत आहेत. या चित्रपटाच्या विरोधात निवेदन करणाऱ्या शीख गटांना आक्षेपार्ह आढळलेल्या सीनपैकी हा एक आहे.
6. चित्रपटात 2 तास 12 मिनिटांच्या सीनमध्ये इंदिरा गांधी आणि तत्कालीन लष्करप्रमुख ऑपरेशन ब्लूस्टारवर चर्चा करताना दिसत आहेत. CBFC ने चित्रपट निर्मात्यांना 'अर्जुन दिवस'चा संदर्भ काढून टाकण्यास सांगितले आहे.
7. बोर्डाची इच्छा आहे की, चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटात वापरल्या जाणाऱ्या वास्तविक फुटेजसाठी, जेथे लागू असेल तेथे डिस्क्लेमर टाकावेत. असे सांगितले आहे.
8. चित्रपट निर्मात्यांना चित्रपटात नमूद केलेल्या सर्व आकडेवारी, विधाने आणि संदर्भांसाठी कागदोपत्री पुरावे सादर करण्यास सांगितले आहे.
CBFC ने सांगितलेले सर्व बदल लक्षात घेऊन त्याची अंमलबजावणी करण्यास सांगितले आहे. आता या चित्रपटाचा निर्णय 30 सप्टेंबर रोजी होणार आहे.