Kangana Ranaut On Pathaan Earning: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) मागील काही दिवसांपासून काही ना काही कारणामुळे चर्चेत आहे. दोन दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या 'पठाण' (Pathaan Movie) चित्रपट पाहण्यासाठी दुसऱ्याच दिवशी कंगना चित्रपटगृहामध्ये पोहोचली होती. कंगनाने केवळ शाहरुख खान आणि दीपिका पादुकोणचा चित्रपटच पाहिला असं नाही तर चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक ही केलं. ज्या दिवशी 'पठाण' चित्रपट प्रदर्शित झाला त्या दिवशी कंगनाने थेट कोणाचाही उल्लेख न करताना एक ट्वीट केलं होतं. यामध्ये तिने चित्रपटाचं यश पैशांमध्ये मोजणारे मुर्ख आहेत, असं म्हटलं होतं. विशेष म्हणजे कंगनाच्या या ट्वीटवरुन अनेकांनी तिला ट्रोल केलं आहे.
All those who are claiming Pathan is triumph of love over hate,I agree but whose love over whose hate? Let’s be precise, whose is buying tickets and making it a success?Yes it is India’s love and inclusiveness where eighty percent Hindus lives and yet a film called Pathan (cont)
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 27, 2023
अशाच पद्धतीने कंगनाला ट्रोल करणाऱ्या नीरव मोदी नावाच्या व्यक्तीला जशास तसं उत्तर दिलं आहे. नीरव हा एक अॅथलीट आहे. त्याने आपल्या ट्वीटमध्ये कंगनाला टॅग करताना, "पठाणची एका दिवसाची कमाई तुमच्या पूर्ण आयुष्यातील कमाईपेक्षा जास्त आहे," असा टोमणा मारला. यावर कंगनानेही रिप्लाय केला आहे.
Pathaan’s single day earning is more than your life time earnings
— Dr Nimo Yadav (@niiravmodi) January 27, 2023
"निमो भाई माझ्याकडे पैसेच उरलेले नाही. मी माझं घर, माझं ऑफिस सारं काही गहाण ठेवलं आहे ते सुद्धा केवळ एक चित्रपट बनवण्यासाठी. हा चित्रपट भारतीय संविधान आणि या महान देशाबद्दल आपल्याला वाटणाऱ्या प्रेमाचा उत्सव साजरा करणार चित्रपट आहे. पैसे तर सगळेच कमवतात, मात्र असं कोणी आहे का जो ते उडवू शकेल?" असा प्रश्न कंगनाने रिप्लायमध्ये विचारला आहे.
Nimo bhai i don’t have any earnings left, I have put my house my office every single thing that I owned on mortgage just to make a film which will celebrate the constitution of India and our love for this great nation … paise toh sabhi kama lete hain aisa koi hai jo aise udai ?
— Kangana Ranaut (@KanganaTeam) January 27, 2023
कंगनाच्या या रिप्लायवर या व्यक्तीने पुन्हा रिप्लाय करत, "जर खरच तुझा संविधानावर विश्वास असेल तर तुला ठाऊक असायला हवं की जर एखादी व्यक्ती थेअटरमध्ये जात असेल तर ती या विचाराने जात नाही की मी मुस्लीम आहे अथवा हिंदू. ते फक्त तीन तासांच्या मनोरंजनासाठी जातात. त्यामुळे हा हेट प्रोपोगांडा करणं बंद करा आणि मला भाऊ म्हणू नका," असं उत्तर दिलं.
If you really believe in constitution then you should now when anyone goes to theatre, Woh yeh soch ke nahi jata main muslim hoon, main Hindu. Balki woh apne 3 ghante ke entertainment ke liye jata hai
So yeh hate propagate karna band kijiye aap and don’t call me bhai
— Dr Nimo Yadav (@niiravmodi) January 27, 2023
या संवादावरुन दोन गट पडले असून काहीजण कंगानाला पाठिंबा देत आहेत तर काहींनी या रिप्लायवरुन तिला पुन्हा ट्रोल केलं आहेत.