Kangana Ranaut पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोल, 'हातात दारूचा ग्लास आणि हिंदू धर्मावर...' Video Viral

Kangana Ranaut :  बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut)  ट्विटर (Twitter account) अकाउंट बंदी उठवल्यानंतर सोशल मीडियावर तिच्या एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनंतर ती पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. 

Updated: Jan 27, 2023, 02:08 PM IST
Kangana Ranaut पुन्हा नेटकऱ्यांकडून ट्रोल, 'हातात दारूचा ग्लास आणि हिंदू धर्मावर...' Video Viral title=
Trending Video Kangana Ranaut again trolled by netizens glass of liquor in hand and dance Video Viral on Social media

Kangana Ranaut Viral Video :  एकीकडे 'पठाण'च्या रेकॉर्ड ब्रेक (Pathaan Box Office Collection) कमाईनंतर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतनं (Kangana Ranaut) शाहरुख खानला (Shahrukh Khan) डिवचलं आहे.  ट्विटर (Twitter account) अकाउंट बंदी उठवल्यानंतर तिने सगळ्यात पहिले शाहरुख खानला लक्ष्य केलं आहे.  तरदुसरीकडे नेटकऱ्यांनी कंगना रणौतला ट्रोल केलं आहे.  हिंदूवर बोलणाऱ्या या अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये तिच्या हातात दारुचा ग्लास दिसतं आहे. हा व्हिडीओ एका पार्टीचा असून अभिनेत्रीचा दारुच्या ग्लाससोबतचा डान्स पाहून नेटकरी संतापले आहेत. 

'हातात दारूचा ग्लास आणि हिंदू धर्मावर...' 

या व्हिडीओमध्ये कंगना काळ्या रंगाचा ड्रेस घालून दारुचा ग्लास घेऊन सिद्धू मुसेवालाच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ फिल्मी कलाकार या इन्स्टाग्राम (Instagram) अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे.  हा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संप्तत भावना व्यक्त केल्या आहेत. ( Trending Video Kangana Ranaut again trolled by netizens glass of liquor in hand and dance Video Viral on Social media)

'संस्कार, संस्कृती, हिंदूत्व याचा तरी विचार करायचा होता. प्रेक्षकांना जे सांगतेच ते विसरुन जातेस का?',  अशी कमेंट एका यूजर्सने केली आहे. तर दुसरा म्हणतो की, 'बॉलिवूडमधील संस्कारी अभिनेत्री ही आहे असं वाटतं होतं', तर तिसरा यूजर म्हणतो की, 'हिंदू धर्म आणि संस्कृतीचं पालन करत भजन-किर्तनात दंग एक स्त्री', अशी परखड टीका केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by FilmyKalakar (@filmykalakar)

या पार्टीमधील व्हिडीओ (Party Video)

आगामी इमर्जन्सी (Emergency) चित्रपटाची नुकतंच शूटिंग पूर्ण झालं आहे. यानिमित्ताने एका पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळचा हा व्हिडीओ आहे. हा चित्रपट भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या जीवनावर आधारित आहे. कंगनासोबत या चित्रपटात मिलिंद सोमण (Milind Soman), श्रेयस तळपदेदेखील ( Shreyas Talpade) दिसणार आहेत.