पाकिस्तानने घेतला कंगनाचा सिनेमा डोक्यावर

 'थलायवी' चित्रपट पाकिस्तानमध्ये ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे.

Updated: Oct 11, 2021, 07:24 PM IST
पाकिस्तानने घेतला कंगनाचा सिनेमा डोक्यावर title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौतचा 'थलायवी' चित्रपट केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांमध्ये ट्रेंण्ड  होत आहे. जे. जयललिता यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट मायक्रोब्लॉगिंग साइटवर ट्रेंड करत आहे. विशेष म्हणजे हा चित्रपट भारतातच नव्हेतर पाकिस्तानमध्ये ट्विटरवर ट्रेंड करत आहे. मात्र, पाकिस्तानमध्ये चित्रपट ट्रेंड होण्याचं कारण जरा वेगळं आहे.

का होतोय थलायवी ट्रेंडिंग?
पाकिस्तानमधील लोकं सिनेमाबद्दल निंदा आणि वाईट ट्विट करत आहेत आणि चित्रपटाचा निषेध करत आहेत. ज्यामुळे रविवारी पाकिस्तानमध्ये ट्विटरवर हा चित्रपट ट्रेंड होऊ लागला. काही दिवस चित्रपटगृहांमध्ये चालवल्यानंतर, हा सिनेमा नेटफ्लिक्स डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. कंगना राणावतने इंस्टा स्टोरीवर पाकिस्तानमधील नेटफ्लिक्सच्या टॉप 10 चित्रपटांची यादी शेअर केली. ज्यात 'थलायवी' टॉपवर दिसत आहे.

'देशद्रोही फक्त भारतातच नाही'
याच कारणामुळे हा चित्रपट पाकिस्तानमध्येही ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला. काही स्क्रीनशॉट शेअर करत कंगना राणौतने तिच्या इन्स्टा स्टोरीवरमध्ये लिहिलं आहे की, 'मस्करीत म्हणायचं झालं तर, हे बघून दिलासा मिळतोय की, देशद्रोही केवळ या देशातच नाहीत.' कंगना रनौतने या चित्रपटात तामिळनाडूच्या दिवंगत ज्येष्ठ राजनेता जे. जयललिता यांची भूमिका साकारली आहे.

कंगना लवकरच या चित्रपटांमध्ये दिसणार आहे
अरविंद स्वामी आणि नसार यांनीही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हा एक मल्टीनेशनल बायोग्राफिकल चित्रपट आहे ज्यात जयललिता यांचं जीवन अतिशय सुंदरपणे दाखवण्यात आलं आहे. वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कंगना राणावतचे काही नवीन चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहेत. यामध्ये अभिनेत्रीच्या 'तेजस' आणि 'धाकड' चित्रपटांचाही समावेश आहे.