मुंबई : अभिनेत्री सामंथा अक्कीनेनी आणि नागा चैतन्य यांच्या घटस्फोटानंतर सामंथाची स्टाइलिस्ट प्रीतम जुकळकर हिला जीवे मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. समंथा आणि नागा चैतन्य एकमेकांपासून विभक्त झाले आहेत आणि आता नागा चैतन्यचे चाहते यूट्यूबवर अभिनेत्रीच्या स्टायलिस्टला धमकावत आहेत.
का मिळत आहेत धमक्या?
विभक्त झाल्यानंतर या कपलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती आणि आवाहन केलं होतं की, त्यांचा निर्णय सार्वजनिक झाल्यानंतर त्यांना काही गोष्टींची प्रायव्हसी द्यावी, मात्र असं असूनही, तिच्या स्टाईलिस्टला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. नागा चैतन्यचे फॅन्स समंथाच्या स्टायलिस्टला ट्रोल करत आहेत. जुलकर सामंथाची स्टायलिस्ट असण्याव्यतिरिक्त, तिची जवळची मैत्रिण देखील आहे.
लव्ह ट्रायंगलचा आहे मामला?
सामंथा आणि नागाच्या विभक्त होण्याच्या बातम्या आधीच व्हायरल होत होत्या पण नंतर जेव्हा सामंथा आणि जुकलकर यांच्या जवळीकीच्या बातम्या येऊ लागल्या तेव्हा प्रकरण बिघडू लागलं. हेच कारण आहे की जुकळकरांना सोशल मीडियावर सगळीकडे ट्रोल केलं जात आहे आणि नागाचे चाहते त्याला जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत.
youtube वर अशा मिळत आहेत धमक्या
जुकलकरांसोबत वाढत्या जवळीकीमुळे सामंथा अक्किनेनी नागा चैतन्यपासून वेगळी होत असल्याचे चाहत्यांना वाटतं. युट्यूबवर लोक जुमालकरला सामंथाच्या जवळ असल्याबद्दल तीव्र ट्रोल करत आहेत