कंगना राणौतकडून मराठीत ट्विट, म्हणते...

त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन. 

Updated: Sep 12, 2020, 06:50 PM IST
कंगना राणौतकडून मराठीत ट्विट, म्हणते... title=

मुंबई: पालिकेच्या कारवाईनंतर संतप्त झालेली अभिनेत्री कंगना राणौत सातत्याने शिवसेनेवर शाब्दिक हल्ला चढवत आहे. कंगनाने शनिवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक चित्र शेअर केले. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज कंगनाच्या हातात तलवार देतानाचा काल्पनिक प्रसंग चितारण्यात आला आहे. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रावणाप्रमाणे दहा तोंडे दाखवण्यात आली आहेत. विशेष म्हणजे या चित्रासोबत कंगनाने मराठीत ट्विट केले आहे. 
यामध्ये कंगना राणौतने म्हटले आहे की, झाशीची राणी लक्ष्मीबाई, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी माझं कार्य पुढे करत राहीन. जरी त्यांनी मला घाबरवण्याचा खूप प्रयत्न केला तरीही मी धैर्याने पुढे जात राहीन. 

... हा तर सरकार पुरस्कृत दहशतवाद; देवेंद्र फडणवीसांची महाविकासआघाडीवर टीका

यापूर्वी कंगना राणौतने महाराष्ट्रात सरकारचे अत्याचार वाढल्याचे म्हटले होते. नागरिकांच्या संवैधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्रात हस्तक्षेप करावा, असेही कंगनाने म्हटले होते. यासोबत कंगनाने #UddhavThackerayResign असा हॅशटॅगही वापरला होता. 

महाराष्ट्रात सरकारचे अत्याचार वाढलेत, केंद्राने हस्तक्षेप करावा- कंगना राणौत 

मात्र, शिवसेना सध्या कंगना प्रकरणावर मौन बाळगणे पसंत करताना दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व पदाधिकाऱ्यांना कंगना प्रकरणावर न बोलण्याची सक्त ताकीद देण्यात आल्याचे समजते. त्याऐवजी शिवसेनेकडून कंगनाची कायदेशीर मार्गाने कोंडी केली जाऊ शकते.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x