पंतप्रधान मोदी कृष्णाचा अवतार, त्यांचा जन्म...; कंगनाने पुन्हा उधळली स्तुतीसुमनं

Kangana Ranaut On Pm Modi: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे. त्यात तिने म्हटलं आहे की... 

Updated: Nov 2, 2023, 03:24 PM IST
पंतप्रधान मोदी कृष्णाचा अवतार, त्यांचा जन्म...; कंगनाने पुन्हा उधळली स्तुतीसुमनं title=
Kangana Ranaut Feels PM Narendra Modi Is Lord Shri Krishna Avatar

Kangana Ranaut On Pm Modi: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वक्तव्यांमुळं सतत चर्चेत असते. अलीकडेच कंगनाचा तेजस (Tejas) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही आपली कमाल दाखवू शकला नाही. मात्र तरीही कंगनाकडून या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. त्याचदरम्यान कंगनाचे एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी सांगताना कंगनाने ते कृष्णाचा अवतार आहेत, असं म्हटलं होतं. कंगनाच्या या वक्तव्यानंतर ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. (Kangana Ranaut On Pm Modi)

तेजस चित्रपटाच्या निमित्ताने कंगना सध्या प्रमोशनात व्यस्त आहे. त्याचवेळी एका कार्यक्रमात तिने पंतप्रधान नरेंद्र मोदींविषयी एक वक्तव्य केलं आहे. यात तिने पंतप्रधान मोदी अवतार असल्याचे म्हटलं आहे. यापूर्वीही तिने मोदींची तुलना भगवान राम यांच्यासोबत केली होती. कंगना आता पुन्हा नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आली आहे. 

नरेंद्र मोदी, अटल बिहारी वाजपेयी आणि इंदिरा गांधी यांच्यापैकी सर्वात आवडते पंतप्रधान कोण असा प्रश्न मुलाखतीत कंगनाला विचारण्यात आला तेव्हा तिने  पंतप्रधान मोदी माझे आवडते पंतप्रधान आहेत. असं उत्तर दिलं. त्याचबरोबर, त्यामागचं कारणही तिने स्पष्ट केलं आहे. माझं असं म्हणण्यामागे एक कारण आहे. पंतप्रधान मोदी देशासाठी एक अवतार आहेत. ते साधाराण मनुष्य नाहीयेत. त्यांचा जन्म देशाचा उद्धार करण्यासाठी झाला आहे, असं कंगनाने म्हटलं आहे. 

पुढे मुलाखतीत तिने म्हटलं आहे की, माझ्या या वक्तव्यावर मी ट्रोल होऊ शकते हे मला माहितीये. त्यावर माझी काहीएक तक्रार नाहीये. पण जे लोक खऱ्याच्या बाजूने आहेत. माझे वक्तव्य त्यांच्यासाठी औषध म्हणून काम करेल. जेव्हा कृष्णाच्या विरोधात बोललं गेलं तेव्हा त्याचा मित्र सुदामा धावून आला. त्यानं त्याच्याविषयी सांगितलं. तो देव आहे. असे सुदामा म्हणाला होता. तेव्हा दुर्योधनानं आक्षेप घेत कृष्णाविषयी अपशब्द उच्चारले होते. त्यानंतर काय घडलं हे आपल्याला माहिती आहे, असं म्हणत कंगनाने तिच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

कंगनाचा हा व्हिडिओ जबरदस्त व्हायरल होतोय. कमाल आर खान यानेही कंगनाचा हा व्हिडिओ ट्विट केला आहे. व्हिडिओ ट्विट करताना त्याने कॅप्शनही दिलं आहे. कंगनाजीने सांगितले आहे की मोदीजी एक अवतार आहेत. कंगनाच्या या वक्तव्यावर तिला अनेकांनी सुनावले आहेत.