कंगना रनौतने तिच्या बोल्ड अवताराने उपस्थितांना केलं बोल्ड

लखनऊचा राहणारा जितेश सिंह देव यांने पीटर इंग्लंडच्या मिस्टर इंडिया २०१७ चा खिताब जिंकला आहे. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Dec 16, 2017, 03:03 PM IST
कंगना रनौतने तिच्या बोल्ड अवताराने उपस्थितांना केलं बोल्ड title=

मुंबई : लखनऊचा राहणारा जितेश सिंह देव यांने पीटर इंग्लंडच्या मिस्टर इंडिया २०१७ चा खिताब जिंकला आहे. 

१७ प्रतिस्पर्धी

अभी खजुरिया फर्स्ट रनर-अप तर पवन राव द्वितीय रनर-अप ठरला. मिस्टर इंडिया स्पर्धेत फायनलमध्ये १७ प्रतिस्पर्धी होते. अभिनेत्री कंगना रनौतने विजेत्यांना पुरस्कार प्रदान केला.

कंगनाचा बोल्ड अंदाज

पीटर इंग्लंड मिस्टर इंडिया २०१७ मध्ये कंगना काही अशा अंदाजमध्ये पोहोचली की सगळे तिच्याकडे बघतच राहिले. बॉलिवूडच्या या राणीने आपल्या बोल्ड स्टाइलने सगळ्यांच बोल्ड केलं. कंगनासाठी हा ड्रेस तिच्या आवडत्या डिझायनर बिभाह महापात्रा यांनी डिझाईन केला होता.

कंगना ही बिनधास्त बोलणारी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. कंगनाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.