कमल हसन यांचं मोठं वक्तव्य; 'या कारणामुळे 5 वर्षे सिनेमापासून दूर राहिलो '....

साउथ इंडस्ट्रीतील सर्वात मोठे सुपरस्टार अभिनेता कमल हसन बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत

Updated: Jun 5, 2022, 09:38 PM IST
कमल हसन यांचं मोठं वक्तव्य; 'या कारणामुळे 5 वर्षे सिनेमापासून दूर राहिलो '.... title=

मुंबई : साउथ इंडस्ट्रीतील सर्वात मोठे सुपरस्टार अभिनेता कमल हसन बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत. नुकताच कमल हासन यांचा 'विक्रम' हा नवीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. मात्र हा चित्रपट रिलीज होण्याआधीच कमल हासन छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध कॉमेडी शो कपिल शर्माला हजेरी लावण्यासाठी आले होते. यादरम्यान, कमल यांनी आपल्या विक्रम चित्रपटाच्या प्रमोशनसोबतच आपण गेल्या 5 वर्षांपासून चित्रपटसृष्टीपासून का गायब होतो याचं रहस्यही उघडलं आहे.

कमल हसन यांनी सांगितलं मोठं कारण
साऊथ सिनेसृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक कमल हासन खऱ्या आयुष्यात खूप निरागस व्यक्ती आहे.  आपल्या ओपन मूडसाठी ओळखले जाणारे कमल हासन जेव्हा प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माच्या द कपिल शर्मा शोमध्ये पोहोचले. तेव्हा  या कार्यक्रमात उपस्थित प्रेक्षकांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचं स्वागत केलं.

दरम्यान, कपिल शर्मासोबतच्या संभाषणात कमल हसन म्हणाला की, गेल्या 5 वर्षांपासून मी चित्रपटात दिसलो नाही आणि तुझ्या शोमध्ये येऊ शकलो नाही याची मला खंत आहे. त्यामागे राजकीय बांधिलकी हेच कारण आहे. यावेळी कमल यांनी सांगितलं की, मी मनापासून आणि मनाने राजकारण केलं. कमल हसन हे दक्षिण भारतातील  राजनीतिक पार्टी मक्कल निधि मय्यम (MNM) चे संस्थापक आहेत.

कमल हसन यांचं मोठ्या पडद्यावर जोरदार पुनरागमन झालं आहे
5 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर पुनरागमन करणाऱ्या अभिनेता कमल हासन यांचं जोरदार पुनरागमन झालं आहे. दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या विक्रम या चित्रपटातून कमल हसन यांनी सिनेविश्वात दमदार पुनरागमन केलं आहे. कमल हासन यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळेच रिलीजच्या दोन दिवसांत विक्रमने जगभरात १०० कोटींची कमाई केली आहे.