लग्नाआधी गरोदर असलेल्या अभिनेत्रीच्या आईची प्रतिक्रिया

कल्कीचा Pregnancy बद्दल मोठा खुलासा.  

Updated: Jan 18, 2020, 11:59 AM IST
लग्नाआधी गरोदर असलेल्या अभिनेत्रीच्या आईची प्रतिक्रिया title=

मुंबई :  सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिकेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या बऱ्याच अभिनेत्रींमधील एक नाव म्हणजे कल्की केक्ला. आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने बॉलिवूडमध्ये आपले वर्चस्व प्रस्तपित केले. सध्या कल्की तिच्या रिलेशनशिपमुळे आणि गरोदरपणामुळे चांगलीच चर्चात आहे. Guy Hershberg या आपल्या जोडीदारासोबत ती तिच्या बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहे. पण लग्नाच्या आधी गरोदर पाहिल्यामुळे सोशल मीडियावर तिला चांगलेच धारेवर धरले होते. 

दरम्यान, रेडिओ शोवर झालेल्या एका मुलाखतीत तिने आपल्या कुटुंबाच्या तिच्या गरोदरपणावर काय प्रतिक्रिया होत्या? याचा खुलासा केला. या मुलाखतीत अभिनेत्री करिना कपूर खानने तिला कुटुंबातील सदस्यांचे तुझ्या गरोदरपणावर काय मतं होतं असा प्रश्न विचारला. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Belly button wink Outfit- @raw_mango Shoes -@purrplecloudsofficial Jewellery- @tribebyamrapali HMU- @angelinajoseph Styled by- @who_wore_what_when Photography- @anurag_kabburphotography

A post shared by Kalki (@kalkikanmani) on

तेव्हा कल्की आईने दिलेला सल्ला सांगत म्हणाली, 'आता जेव्हा लग्न करशील तेव्हा खूप विचार करून कर. ते नातं आयुष्यभरासाठी टिकलं पाहिजे.' असा सल्ला कल्कीच्या आईने दिला. अनुराग कश्यपसोबत कल्कीचं लग्न झालं होतं. पण हे नात फार काळ टिकलं नाही. त्यामुळे घाईत कोणताही निर्णय न घेण्याचा सल्ला कल्कीच्या आईने दिला. 

बॉलिवूड निर्माता, दिग्दर्शक अनुराग कश्यप याच्यासोबत कल्कीने २०११ मध्ये लग्न केलं होतं. पण, काही वर्षांतच त्यांच्या या नात्यात दुरावा आला. अखेर २०१५ मध्ये या दोघांनीही कायदेशीररित्या एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला. सध्याच्या घडीला कल्की तिच्या खासगी आयुष्यात बरीच पुढे आली आहे.