'बागबान' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, पतीकडून बेल्टनं मारहाण; बाथरुममध्ये नेत...

सेलिब्रिटी वर्तुळातून आणखी एक हिंसाचाराची घटना उघड   

Updated: Aug 5, 2021, 04:09 PM IST
'बागबान' फेम अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, पतीकडून बेल्टनं मारहाण; बाथरुममध्ये नेत...  title=
छाया सौजन्य- सौशल मीडिया

मुंबई : यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सेलिब्रिटी विश्वाला हादरा देणारी वृत्त समोर आली. यामध्ये घरगुती हिंसा आणि आत्महत्यांची प्रकरणं अनेकांनाच हादरवणारी ठरली. अनेक प्रसिद्ध चेहऱ्यांनी माध्यमांसमोर येत जाहीरपणे आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली. या यादीत आता आणखी एका नावाचा समावेश झाला आहे. 

'बागबान' आणि टेलिव्हीजन शो 'नागिन' फेम अभिनेत्री (arzoo-govitrikar) आरजू गोवित्रीकर हिनं तिच्या पतीविरोधात घटस्फोटाचा अर्ज केला आहे. 2019 मध्ये आरजूनं तिच्यावर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडत पती आपल्याला मारहाण करत असल्याची धक्कादायक बाब उघड केली होती. वरली पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल करत मद्यधुंद अवस्थेत पती आपल्याला मारहाण करत असल्याचा आरोप तिनं लावला होता. 

मध्यरात्र उलटून गेल्यानंतर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास पतीनं बाथरुममध्ये नेत आपल्याला मारहाण केल्याची खळबळजनक माहिती तिनं उघड केली होती. ज्यानंतर आता दोन वर्षांनंतर तिनं या प्रकरणी खुलेपणानं वक्तव्य केलं आहे. 

एका वृत्तपत्राशी संवाद साधताना ती म्हणाली, 'हो हे खरं आहे की मी पतीपासून घटस्फोट घेत आहे. मी आता थकले आहे. आता मला मागे वळून पाहायचं नाहीये. मी या नात्यासाठी स्वाभिमानही गमावला होता. केव्हाच मी माध्यमांशी यासंदर्बात बोलले नव्हते. 2 वर्षांनंतर मी आता हे सांगतेय की त्या माणसानं गळा पकडून मला खेचल नेकं होतं. खूप मारहाण केली होती.'

रशियन महिलेशी होते संबंध 
पतीनं आपल्याला पट्ट्यानं मारहाण करत घराबाहेर काढलेलं असा धक्कादायक खुलासा तिनं केला. पोटावरही लाथ मारली होती, असं सांगत आपल्याला त्या अवस्थेत सर्वांनी पाहावं असं मला वाटत नव्हतं अशा शब्दांत तिनं आपली परिस्थिती सर्वांपुढे ठेवली. सिद्धार्थ, म्हणजेच आरजूचा पती एका रशियन महिलेला डेट करत असल्याची माहितीही खुद्द आरजूनं दिली. पतीकडून तिची घरातील मोलकरीण अशी ओळख करुन दिली जात होती. लग्नानंतर अवघ्या दोन वर्षांमध्येच तिची ही अवस्था झाली होती. ज्यानंतर अखेर तिनं मोठा निर्णय घेत सिद्धार्थपासून घटस्फोटासाठीचा अर्ज केला.