अभिनेत्री काजोलने घर दिलं भाड्याने, पण नेमकं असं का केलं? वाचा

बॉलीवूड अभिनेत्री काजोल खूप हुशार अभिनेत्री आहे.

Updated: Dec 18, 2021, 08:56 PM IST
 अभिनेत्री काजोलने घर दिलं भाड्याने, पण नेमकं असं का केलं? वाचा title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेत्री काजोल ही जेवढी हुशार अभिनेत्री आहे. तितकीच हुशार ती एक गुंतवणूकदार आहे. काजोलने तिचे पैसे अशा ठिकाणी गुंतवले आहेत जिथून तिला भरपूर कमाई मिळते. काजोल ही सर्वोत्तम गुंतवणूक करणारी अभिनेत्री मानली जाते. काजोलने अलीकडेच तिचं एक आलिशान अपार्टमेंट भाड्याने दिलं आहे. ज्यासाठी तिला चांगली रक्कम मिळते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काजोलचे हे घर पवईच्या हिरानंदानी गार्डनमध्ये आहे.

काजोलचं हे अपार्टमेंट ७७१ स्क्वेअर फुटांचा आहे. हिरानंदानी गार्डनच्या 21व्या मजल्यावर हे अपार्टमेंट आहे. ज्याचा करार नुकताच तयार करण्यात आला आहे. 3 डिसेंबर रोजी या कराराची नोंदणी करण्यात आली आहे. कागदपत्रांनुसार या घरासाठी भाडेकरूने सुरक्षा म्हणून तीन लाख रुपये जमा केले आहेत. सध्या या घराचे भाडं दरमहा ९० हजार रुपये आहे. मात्र एका वर्षानंतर घराचे भाडे ९६ हजार ७५० रुपये होणार आहे.

काजोल आणि तिचं कुटूंब मुंबईतील जुहू येथील भागात राहतात. त्यांचा येथे आलिशान बंगला आहे. त्याच्या घराचं नाव शिवशक्ती आहे. त्यांच्या घराजवळ अभिनेते अमिताभ बच्चन, अक्षय कुमार आणि हृतिक रोशनसारखे मोठे सेलिब्रिटी राहतात. अजयने जुहूचा हा बंगला 60 कोटी रुपयांना खरेदी केला होता. त्यांचं हे घर ५९० स्क्वेअर यार्डमध्ये बांधले आहे.

काजोलच्या आधी अमिताभ बच्चन आणि सलमान खान यांचं घर भाड्याने दिल्याच्या बातम्याही समोर आल्या होत्या. अभिनेत्री क्रिती सेननने अमिताभ बच्चन यांचं घर भाड्याने घेतलं आहे. अंधेरी परिसरात असलेल्या या डुप्लेक्स घरासाठी अभिनेत्री दर महिन्याला 10 लाख रुपये भाडे देणार आहे.