Navratri 2022: देवीच्या मंडपात काजोलची कुटुंबियातील सदस्यावर आगपाखड, Video व्हायरल

Navratri 2022:  काजोलचा देवी मंडपातील दुर्गेचा रौद्र अवतार घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media)  व्हायरल होतो आहे. 

Updated: Sep 29, 2022, 02:40 PM IST
Navratri 2022: देवीच्या मंडपात काजोलची कुटुंबियातील सदस्यावर आगपाखड, Video व्हायरल title=
kajol anger videoViral and Navratri 2022 nm

Kajol​: देशभरात सगळीकडे नवरात्रीची धूम सुरु आहे. घरोघरी महिलांनी घटस्ठापना (Ghatsthapana 2022) आणि अखंड दिवा लावला आहे. सार्वजनिक मंडपात देवीचं आराधना केली जातंय. बंगली समाजात (Bengali society) देवीचा मोठ्या उत्साह साजरा केला जातो. मुंबईतील (Mumbai) देवींच्या मंडपात अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी (Bollywood celebrities) देवीच्या दर्शनाला जातात. बॉलिवूड अभिनेत्री काजोल (kajol) संपूर्ण मुखर्जी कुटुंबियांसोबत दरवर्षी बंगाली देवी मंडपात दर्शनासाठी जाते. 

काजोलचा देवी मंडपातील दुर्गेचा रौद्र अवतार घेतलेला व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social media)  व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये काजोल आपल्या धाकट्या बहिणीशी वाद घालताना दिसतं आहे. देवीच्या मंडपात अनेक लोक आली होती. त्या सगळ्यांसमोर काजोल आणि तनिषाचं (Tanisha Mukharjee) जोरदार भांडण झालं. काजोल येणार म्हणून त्या मंडपात पहिलेपासून असंख्य कॅमेरे तिच्यावर नजर ठेवून होते. (kajol anger videoViral and Navratri 2022 nm)

या कॅमेऱ्यांचा विचार न करता, काजोल आणि तनिषाचं कुठल्या तरी विषयावरुन वाद सुरु होता. या व्हिडीओमध्ये आपण बघू शकतो, अखेर बहिणीमधील वाद सोडवण्यासाठी आई तनिजाला (Tanuja) पुढाकार घ्यावा लागला. विशेष म्हणजे पत्रकारांनी फोटो काढण्यासाठी म्हटल्यावर तनिषा, तनुजा आणि काजोल एकत्र छान पोजही देतात. आई तनुजा तनिषा आणि काजोलचा फोटोसाठी जवळ घेते. 

हा व्हिडीओ जुना असून पुन्हा एकदा व्हायरल (Viral) झाला आहे. सोशल मीडियावर एखादा व्हिडीओ कधीपण व्हायरल व्हायला वेळ लागतं नाही. नवरात्रीचे दिवस असल्यामुळे हा व्हिडीओ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.