वयाच्या 19 व्या वर्षी लग्न, एक मुलगी; आता 38 व्या वर्षीही इतकी फिट आहे ही अभिनेत्री; कसं जमतं...?

अभिनेत्रीचा फिटनेसपाहून नेटकरीही हैराण आहेत...

Updated: Nov 12, 2022, 11:23 AM IST
वयाच्या 19 व्या वर्षी लग्न, एक मुलगी; आता 38 व्या वर्षीही इतकी फिट आहे ही अभिनेत्री; कसं जमतं...? title=

मुंबई : छोट्या पडद्यावरील 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मध्ये (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) दयाबेन अनेक वर्षांपासून दिसली नाही. दिशा वकानीची चाहते अजूनही प्रतिक्षा करत आहेत. दिशा शोमध्ये न दिसण्याचे कारण म्हणजे गर्भधारणा नंतर मुलीचा जन्म आणि निर्मात्यांशी भांडणं असल्याचे म्हटले जाते. दिशा वकानीनं मालिकेला रामराम करताच अनेक अभिनेत्रींनी या भूमिकेसाठी ऑडिशन दिलं. मात्र, निर्मात्यांनी कोणालाच या भूमिकेसाठी फायनलाइज केलं नाही. या भूमिकेसाठी ऑडिशन दिलेल्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे काजल पिसाळ (Kajal Pisal ). काजलला दयाबेनच्या भूमिकेसाठी फायनल केल्याच्या बातम्या काही महिन्यांपूर्वी आल्या होत्या. मात्र, या बातमीला काजल किंवा निर्मात्यांनी दुजोरा दिला नाही. 

हेही वाचा : मराठमोळ्या मुलीवर जडलेला बिग बींचा जीव; मग लग्न का होऊ शकलं नाही?

आता अशा चर्चा सुरु झाल्या आहेत की काजलनं दयाबेनच्या भूमिकेसाठी ऑडिशन दिल्यानंतर निर्मात्यांनी तिला कॉल केला नाही. तिनं बरेच दिवस कॉलची प्रतिक्षा केली, पण नंतर समजलं की ती या भूमिकेत बसत नाही. काही कास्टिंग दिग्दर्शकांना आणि निर्मात्यांना असे वाटले की काजलला दयाबेनच्या भूमिकेसाठी फायनलाइज केले आणि त्यामुळे तिला इतर भूमिकांसाठी विचारण्यात आले नाही. जेव्हा काजलला हे कळलं तेव्हा तिनं नवीन प्रोजेक्ट्ससाठी दिग्दर्शकांना संपर्क केला. (kajal pisal rejected in dayaben role taarak mehta ka ooltah chashmah got married at 19 and look her fitness at 38) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

काजल ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध चेहरा आहे. काजलनं 'साथ निभाना साथिया', 'बडे अच्छे लगते हैं' आणि 'सिर्फ तुम' सारख्या मालिकेत काम केले आहे. मात्र, 'सिर्फ तुम' या मालिकेतून काजल घराघरात पोहोचली. लाखो चाहत्यांच्या हृदयावर राज्य करणाऱ्या काजल पिसाळच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलाचं झालं तर काजल 38 वर्षांची असली तरी ती फिट आहे. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी काजल वर्कआऊट करते. खरंतर काजलनं वयाच्या 19 व्या वर्षी लग्न झालं. तिच्या पतीचं नाव अभिजीत पिसाळ आहे. त्या दोघांना एक मुलगी देखील आहे.