काजल अग्रवालच्या प्रेग्नेंसीबाबत पतीचा मोठा खुलासा, सोशल मीडियावर सत्य समोर

पुन्हा एकदा प्रेग्नेंसीमुळे काजल चर्चेत 

Updated: Jan 2, 2022, 09:55 AM IST
काजल अग्रवालच्या प्रेग्नेंसीबाबत पतीचा मोठा खुलासा, सोशल मीडियावर सत्य समोर  title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री काजल अग्रवाल (Kajal Aggarwal) च्या घरी लवकरच चिमुकल्या बाळाचा आवाज ऐकू येणार आहे. काजलचे पती गौतम किचलू 2022 मध्ये बाळाच्या स्वागतासाठी तयारी करत आहे. काजल अग्रवाल गरोदर असल्याची बातमी स्वतः तिच्या नवऱ्याने सगळ्यांसमोर सांगितली आहे. गौतम किचलूने याबाबत पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये काजल लवकरच आई होणार असल्याची माहिती त्याने दिली होती. 

सोशल मीडियावर पोस्ट केला खास फोटो 

1 जानेवारी रोजी गौतम किचलूने इन्स्टाग्राम अकाउंटवर पत्नी काजल अग्रवालचा एक सुंदर फोटो शेअर केला होता. यासोबत त्यांनी लिहिलेल्या कॅप्शनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. फोटो पोस्ट करत त्याने लिहिले, 2022 तुझी वाट पाहत आहे. यासोबतच त्याने गर्भवती महिलेचा इमोजीही शेअर केली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautam Kitchlu (@kitchlug)

गेल्यावर्षी झालं होतं लग्न

गौतम किचलूच्या या पोस्टवरून त्यांनी पत्नी काजलच्या गरोदरपणाकडे बोट दाखवल्याचे स्पष्ट झाले आहे. गौतमची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. कमेंट सेक्शनमध्ये लोक त्यांचे जोरदार अभिनंदन करत आहेत. काजल अग्रवालने 30 ऑक्टोबर 2021 रोजी गौतम किचलूशी लग्न केल्याची माहिती आहे.

गरोदरपणाची बातमी नाकारली नाही 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Gautam Kitchlu (@kitchlug)

काजल अग्रवाल गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नेंसीमुळे चर्चेत आहे. एअरपोर्टवरून काजलचा एक फोटो व्हायरल झाला, ज्याला पाहून लोक तिच्या प्रेग्नेंसीबद्दल अंदाज बांधू लागले. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर काही दिवसांनी काजलने मीडियाशी बोलताना सांगितले होते की, मला सध्या याबद्दल बोलायला आवडणार नाही. योग्य वेळ आल्यावर मी याबद्दल बोलेन. मात्र, यादरम्यान तिने तिच्या गरोदरपणाची बातमी फेटाळून लावली नाही.