कॅनडा : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज संवाद लेखक आणि कलाकार कादर खान (Kadar khan) यांचा मोठा मुलगा अब्दुलa कुद्दस यांचे कॅनडामध्ये निधन झाले आहे. अब्दुल कुद्दूस कादर खान यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा होता. कादर खान यांचेही 2018 मध्ये कॅनडामध्ये निधन झाले होते. अब्दुलच्या मृत्यूचे कारण अद्याप समोर आले नाही. कादर खान यांना सरफराज खान आणि शाह नवाज खान अशी दोन मुले आणखी आहेत. सरफराजने बर्याच चित्रपटांत काम केले आहे. (Kader Khan's eldest son Abdul Quddus dies in Canada)
अब्दुल (Abdul Quddus) हे कॅनडा विमानतळावर चित्रपटसृष्टीच्या चकाकीपासून दूर सुरक्षा अधिकारी होते. एका मुलाखतीत कादर खान म्हणाले होते की, अब्दुल यांच्यामुळेच चित्रपटात त्यांनी खलनायकाची भूमिका करणे बंद केले होते. कारण व्हिलन चित्रपटाच्या शेवटी मार खातो. आणि यावरून अब्दुलचं वर्गातील मुलांशी भांडण झाले. यानंतर, त्यांनी हास्य पात्र साकारण्यास सुरुवात केली.
सिव्हील इंजिनिअर कादर खान यांनी 1973 मध्ये 'दाग' या चित्रपटातून अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात केली होती, यामध्ये राजेश खन्ना आणि शर्मिला टागोर मुख्य भूमिकेत होते, पण 'खून पसीना' मधील ठाकूर झलीम सिंह हे त्याचे पहिले प्रमुख पात्र होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाचे लेखक कादर खान होते.
चित्रपट लेखक म्हणून त्याच्या कारकिर्दीची सुरूवात जवानी दिवानी, रणधीर कपूर आणि जया भादुरी यांच्या मुख्य भूमिकेतून झाली. कादर खान यांनी अमिताभ यांच्या बर्याच चित्रपटांमध्ये काम केले आणि संवादही लिहिले. अमिताभ यांचे परवरिश, मिस्टर नटवरलाल, सुहाग, सत्ते पे सत्ता, नसीब, मुकद्दार का सिकंदर, हम, शहेनशाह सारख्या यशस्वी चित्रपटांसाठी संवाद लिहिले आहेत.