गंभीर आजारावर जस्टिन बीबरची भावनिक पोस्ट

हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरचे जगात असंख्य चाहते आहेत.

Updated: Jan 14, 2020, 10:04 AM IST
गंभीर आजारावर जस्टिन बीबरची भावनिक पोस्ट  title=

मुंबई : हॉलिवूडचा प्रसिद्ध गायक जस्टिन बीबरचे जगात असंख्य चाहते आहेत. शिवाय आंतरराष्ट्रीय दर्जाचा गायक म्हणून देखील त्याची ओळख आहे. त्याच्या चाहत्यांच्या यादीत फक्त मुलीच नाही तर मुलांची संख्या देखील फार मोठी आहे. अनेक तरूणांच्या गळ्यातील तो जणू ताईदच आहे. ज्या कलाकावर संपूर्ण जग इतकं प्रेम करतं तो सध्या एका गंभीर आजाराला झुंज देत आहे. 

जस्टिनच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. जस्टिनने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून त्याच्या आजाराची बातमी चाहत्यांना कळवली आहे. तो लाइम नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. या आजाराचे थेट परिणाम त्याच्या शरीरावर होत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

While a lot of people kept saying justin Bieber looks like shit, on meth etc. they failed to realize I've been recently diagnosed with Lyme disease, not only that but had a serious case of chronic mono which affected my, skin, brain function, energy, and overall health. These things will be explained further in a docu series I'm putting on YouTube shortly.. you can learn all that I've been battling and OVERCOMING!! It's been a rough couple years but getting the right treatment that will help treat this so far incurable disease and I will be back and better than ever NO CAP

A post shared by Justin Bieber (justinbieber) on

लाइम आजाराने त्याची त्वचा, मेंदू, एनर्जी त्याचप्रमाणे संपूर्ण आरोग्यावर परिणाम होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याने आपले दु:ख व्यक्त केले आहे. सोशल मीडिया हे चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रभावी मार्ग आहे. सेलेब्रिटींसोबतच सर्वसामान्य जणता देखील सोशल मीडीयाचा वापर रोजच्या जीवनात करते. 

दरम्यान, जस्टीनने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. फोटो शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये 'अनेक लोक असं म्हणतात की आता जस्टिन बीबर चांगला दिसत नाही. पण मला लाइम रोगाचे निदान झाले आहे. एवढेचं नाही तर क्रॉनिक मोनोचा गंभीर आजार आहे ज्यामुळे माझ्या  त्वचा, मेंदू आणि एनर्जीवर परिणाम होत आहे.' अत्यंत गंभीर असा आजार असला तरी मी लढत असल्याचे तो म्हणाला आहे. 

शिवाय जस्टिन त्याच्या आजाराबद्दल अधिक माहिती यूट्यूबवर प्रदर्शित होणाऱ्या डॉक्यूमेण्ट्रीमध्ये देणार आहे. तर  त्याला चाहत्यासमोर पुन्हा टोपी न घालता यायचे आहे.