आपल्या मुलीवर अक्षयची हीन कमेंट पाहून भडकले विनोद दुआ

कॉमेडियन मल्लिका दुआनं नुकताच #MeToo हॅशटॅग वापरत आपल्यासोबतच एक वाईट अनुभव शेअर केला होता... त्यानंतर ती मीडियात चर्चेचा विषय ठरलीय. आता मात्र, मल्लिकाच्या वडिलांनी अभिनेता अक्षय कुमारला फैलावर घेतल्यानं तेही चर्चेत आलेत. 

Updated: Oct 27, 2017, 08:09 PM IST
आपल्या मुलीवर अक्षयची हीन कमेंट पाहून भडकले विनोद दुआ title=

मुंबई : कॉमेडियन मल्लिका दुआनं नुकताच #MeToo हॅशटॅग वापरत आपल्यासोबतच एक वाईट अनुभव शेअर केला होता... त्यानंतर ती मीडियात चर्चेचा विषय ठरलीय. आता मात्र, मल्लिकाच्या वडिलांनी अभिनेता अक्षय कुमारला फैलावर घेतल्यानं तेही चर्चेत आलेत. 

मल्लिका सध्या 'द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज' या कार्यक्रमात जजच्या भूमिकेत दिसतेय. यापूर्वी मल्लिकानं एका कॅब ड्रायव्हरची तक्रार केल्यानं अनेकांच्या नजरा तिच्यावर स्थिरावल्या होत्या... आता मल्लिकाचे पिता आणि वरिष्ठ पत्रकार विनोद दुआ यांनी या कार्यक्रमाचा को-जज आणि अभिनेता अक्षय कुमार याच्यावर तोंडसुख घेतलंय.


विनोद दुआ यांची प्रतिक्रिया


विनोद दुआ यांची प्रतिक्रिया

विनोद दुआ यांनी अक्षयच्या याच भाषेवर आक्षेप व्यक्त केलाय. 'आपल्या को-वर्करशी बोलण्याची ही भाषा आणि हा त्याचा सेन्स ऑफ ह्युमर आहे... स्टार प्लस जागे व्हा...' असं दुआ यांनी सोशल मीडियावर म्हटलं.

यामुळे वाद निर्माण झाल्यानंतर काही वेळातच दुआ यांनी आपली ही पोस्ट डीलिट केली आहे.  

अक्षयच्या भाषेवर आक्षेप घेत या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ विनोद दुआ यांनी शेअर केला. या व्हिडिओत शाम रंगीलाच्या परफॉर्मन्सनंतर अक्षय मल्लिकाला मल्लिकाला 'मल्लिकाजी आप बेल बजाओ, मै आपको बजाता हूँ' असं म्हणताना दिसतो.