Video: भर कोर्टात Johnny Depp ने एक्स पत्नीसोबत केलं असं की...

या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Updated: May 8, 2022, 12:50 PM IST
Video: भर कोर्टात Johnny Depp ने एक्स पत्नीसोबत केलं असं की... title=

मुंबई : हॉलिवूड स्टार जॉनी डेप आणि त्याची एक्स पत्नी अंबर हर्डचे प्रकरण सध्या सगळीकडे चर्चेत आहे. या प्रकरणात दररोज नवनवीन खुलासे होताना दिसतायत. घटस्फोटानंतर अभिनेत्रीने तिच्या जॉनी डेपवर घरगुती हिंसाचाराचे आरोप केले होते. यानंतर जॉनीने अंबरविरुद्ध कोर्टात मानहानीचा खटला दाखल केला होता. तेव्हापासून या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

कोर्टरूममधील व्हिडीयो आला समोर

दरम्यान आता या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंबर हर्ड आणि जॉनी डेप यांचा हा व्हिडिओ कोर्टरूममधील असून सुनावणीनंतरचा आहे. सोशल मीडियावरून समोर आलेल्या व्हिडिओमध्ये जॉनी डेपच्या एक्सप्रेशन आणि त्यावर अंबरने दिलेल्या प्रतिक्रियेची बरीच चर्चा आहे. 

पोलिसांच्या मदतीनंतर बाहेर पडली अंबर

या व्हिडीयोमध्ये न्यायाधीश सर्व कामकाज संपवतात, त्यानंतर अंबर कोर्टरूममधून बाहेर पडते. यादरम्यान जॉनी देखील बाहेर पडताना तिच्यासमोर येतो. तिला पाहून जॉनी जे एक्स्प्रेशन देतोय ते व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतायत. यावेळी अंबर त्याला पाहून ज्या ठिकाणी उभी असते तिथेच थांबते. शिवाय पोलीसही जॉनीला थांबण्याचे संकेत देताना दिसतात. यानंतर पोलिसांच्या मदतीने अंबर तिथून बाहेर पडते.

अभिनेता जॉनी डेपवर  एक्स पत्नी अंबर हर्डने जबरदस्तीने ओरल सेक्स केल्याचा आरोप केला आहे. जॉनी डेपच्या छळामुळे अॅम्बर हर्डची प्रकृती बिघडली असा दावा मानसशास्त्रज्ञ डॉ. डॉन ह्युजेस यांनी केला आहे. 

ह्यूने यांनी दावा केला की, जॉनी डेपने त्याच्या एक्स पत्नीला ओरल सेक्स करण्यास भाग पाडलं. तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये दारूची बाटलीही टाकली होती.  याआधी डेपच्या वतीने साक्षीदार म्हणून हजर झालेल्या मानसशास्त्रज्ञाने अंबर हर्डचे अनेक आरोप पूर्णपणे खोटं असल्याचं फेटाळून लावले होते आणि अंबर हर्डला PTSD या आजाराने ग्रस्त असल्याचं सांगितलं होतं.