Covid-19 : '..क्योंकी मेरा भारत महान है' जॉनची भावूक कविता

'जहां खेलते थे सब बच्चे अब खाली वो मैदान है.'  

Updated: Apr 20, 2020, 07:19 PM IST
Covid-19 : '..क्योंकी मेरा भारत महान है' जॉनची भावूक कविता title=

मुंबई :  कोरोना व्हायरसचा फैलाव संपूर्ण जगभरात होत आहे. हे युद्ध जिंकण्यासाठी जगातील सर्व राष्ट्र एकत्र आले आहेत. या युद्धाचा सामना करण्यासाठी डॉक्टर, पोलीस, नर्स इत्यादी अत्यावश्यक सेवेत असलेले कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता मैदानात उतरले आहेत. त्यावर आजच्या घडीला सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. या खऱ्या हिरोंचं कौतुक करण्यासाठी बॉलिवूडकर देखील पुढे आले आहेत. अभिनेता जॉन अब्राहमने सोशल मीडियावर एक कविता पोस्ट केली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#MeraBharatMahaan a poem of hope, courage, gratitude for India and the world... #IndiaFightsCorona #StayHomeStaySafe #PMOIndia @milapzaveri @cmomaharashtra_ @pibindia @adityathackeray @mib_india @my_bmc @icmrorganisation @dj.lijo @azeemdayani @zmaahir @kunalmehtas @sagarmanik

A post shared by John Abraham (@thejohnabraham) on

'..क्योंकी मेरा भारत महान है' असा आशय असलेल्या कवितेचं लिखान मिलाप झावेरी यांनी केलं आहे. जॉन ही कविता वाचताना अत्यंत भावूक झालेला दिसत आहे.  'सड़के हैं लावारिस, घर पर बैठा इन्सान है. जहां खेलते थे सब बच्चे अब खाली वो मैदान है. असे  बोल असलेले ही कविता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय मिलापने जॉनच्या 'सत्यमेव जयते' या चित्रपटाचे दिग्दर्शन देखील केले होते.  

या व्हिडिओवर करण जोहर, अनिल कपूर, सिद्दार्थ मल्होत्रा यांनी ट्विट देखील केले आहे. तर आयुष्मान खुराना, काजल अग्रवाल, दिव्या कुमार खोसला इत्यादी कलाकारांनी कमेंट देखील केली आहे. शिवाय नेटकऱ्यांनी देखील या व्हिडिओचं भरभरून कौतुक केलं आहे.