मुंबई : फिल्मफेअर पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. बॉलिवूडमध्ये फिल्मफेअर प्रतिष्ठेच्या मानाचा समजला जातो. 63 व्या जिओ फिल्मफेअर अवॉर्ड्स 2018 मध्ये 'हिंदी मीडियम'ने सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठीचा पुरस्कार पटकावला आहे, तर इरफान खान आणि विद्या बालन यांनी सर्वोत्तम अभिनयासाठी फिल्मफेअर अवॉर्ड पटकावला आहे.
सर्वोत्कृष्ट चित्रपट : हिंदी मीडियम
सर्वोत्कृष्ट चित्रपट (क्रिटीक्स) : न्यूटन
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : विद्या बालन (तुम्हारी सुलू)
सर्वोत्कृष्ट अभिनेता : इरफान खान (हिंदी मीडियम)
सर्वोत्कृष्ट अभिनेता (क्रिटीक्स) : राजकुमार राव (ट्रॅप्ड)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (क्रिटीक्स) : झायरा वसिम (सिक्रेट सुपरस्टार)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : अश्विनी अय्यर तिवारी (बरेली की बर्फी)
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) : कोंकोणा सेन शर्मा (अ डेथ इन द गुंज)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : राजकुमार राव (बरेली की बर्फी)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री : मेहेर वीज (सिक्रेट सुपरस्टार)
सर्वोत्कृष्ट संवाद : हितेश केवल्य (शुभमंगल सावधान)
सर्वोत्कृष्ट पटकथा : शुभाशीष भुतियानी (मुक्ती भवन)
सर्वोत्कृष्ट मूळ कथा : अमित न्यूटन (न्यूटन)
सर्वोत्कृष्ट म्युझिक अल्बम : जग्गा जासूस
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक : अरिजीत सिंग (रोके ना रुके नैना- बद्रीनाथ की दुल्हनिया)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका : मेघना मिश्रा (नचडी फिरा-सिक्रेट सुपरस्टार)
सर्वोत्कृष्ट गीतकार : अमिताभ भट्टाचार्य (उल्लू का पठ्ठा- जग्गा जासूस)
सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन : विजय गांगुली आणि रुएल दौसन वरिंदानी (गलती से मिस्टेक- जग्गा जासूस)
जीवनगौरव पुरस्कार : माला सिन्हा आणि बप्पी लाहिरी