धडक सिनेमाचं आणखी एक पोस्टर अखेर रिलीज

मराठीत गाजलेला सिनेमा सैराटवर हिंदी सिनेमा बनवण्यात येत आहे, या हिंदी सिनेमाचं नाव धडक असणार आहे. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 21, 2018, 08:31 PM IST
धडक सिनेमाचं आणखी एक पोस्टर अखेर रिलीज title=

मुंबई : मराठीत गाजलेला सिनेमा सैराटवर हिंदी सिनेमा बनवण्यात येत आहे, या हिंदी सिनेमाचं नाव धडक असणार आहे. धडक कधी रिलीज होईल याविषयी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होती, अखेर धडक रिलीज करण्याची तारीख जाहीर करण्यात आली आहे. धडक सिनेमा २० जुलै २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

धडकच्या शुटिंगला यापूर्वीच सुरूवात

यापूर्वीच धडकच्या शुटिंगला सुरूवात झाली आहे, शाहीद कपूरचा भाऊ इशान खट्टर हा पर्शाची भूमिका साकारणार आहे, तर श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर ही आर्चीची भूमिका साकारणार आहे. 

सिनेमा २० जुलै २०१८ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला

करण जोहर, झी स्टुडिओ, हिरु यश जोहर, अपूर्वा मेहता यांची निर्मिती असलेल्या धडक सिनेमाच्या शूटिंगला डिसेंबरमध्ये सुरुवात झाली. शशांक खैतान या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. यापूर्वी 6 जुलै 2018 ही 'धडक'च्या प्रदर्शनाची तारीख ठरलेली होती.