पत्रे, डब्बे वाजवणाऱ्या या मुलांचं अमिताभ बच्चन यांच्याशी नेमकं काय नातं, Video खिळवून ठेवणारा

याचं उत्तरही हा व्हिडीओच देत आहे. अवघ्या काही सेकंदांमध्येच हा व्हिडीओ नेमका कशाचा आहे याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. 

Updated: Feb 8, 2022, 12:39 PM IST
पत्रे, डब्बे वाजवणाऱ्या या मुलांचं अमिताभ बच्चन यांच्याशी नेमकं काय नातं, Video खिळवून ठेवणारा  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : रिल्स, शॉर्ट व्हिडीओ, इन्स्टा व्हिडीओ अशा अनेक कारणांनी असंख्य व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत. या व्हायरल होणाऱ्या व्हिडीओंमध्ये डब्बे, पत्रे वाजवणारी मुलं भलतंच लक्ष वेधून जात आहेत. तुटलेले डब्बे, पाईप, थाळ्या वाजवणारी ही मुलं आहेत तरी कोण, हा प्रश्न तुमच्या मनात घर करत आहे का? 

याचं उत्तरही हा व्हिडीओच देत आहे. अवघ्या काही सेकंदांमध्येच हा व्हिडीओ नेमका कशाचा आहे याचं चित्र आता स्पष्ट झालं आहे. 

भांडी, बस बडवणाऱ्या या मुलांनी थेट बिग बी अमिताभ बच्चन यांच्याशीच हातमिळवणी केली आहे. आगामी चित्रपटासाठी हा घाट घातला आहे दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी. 

'सैराट'सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट देणाऱ्या नागराज मंजुळे यांनी त्यांच्या 'झुंड' या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा टीझर चाहत्यांच्या भेटीला आणला आहे. (jhund)

'बडी फिल्म,  बडे परदे पर...' असं कॅप्शन त्यांनी टीझरसोबत जोडलं आहे. 

एका मुलांच्या घोळक्याने टीझरची सुरुवात होते आणि त्याच घोळक्याने शेवट. पण, यादरम्यान बिग बी अमिताभ बच्चन यांची झलकही सर्वांनाच थक्क करुन जात आहे. (Nagraj Manjule Amitabh Bachchan)

4 मार्चला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बी अमिताभ बच्चन या चित्रपटात मुख्य भूमिकेत असतील. 

नागराज मंजुळे यांचा बॉलिवूडमधील हा पहिलाच चित्रपट. महानायकासोबतचं त्याचं नवखं समीकरण आता चित्रपटातून नेमकं कसं दिसेल याचीच उत्सुकता चाहत्यांमध्ये पाहायला मिळत आहे. 

कायमच चौकटीबाहेरचे विषय अतिशय समर्पक आणि संवेदनशीलपणे हाताळण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या मंजुळेचा हा 'झुंड' आता बॉलिवूड गाजवतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.