बॉलिवूडच्या चित्रपटांना 'झिम्मा 2'ची टक्कर!

Jhimma 2 : 'झिम्मा 2 हा चित्रपट अजूनही थिएटरमध्ये आहे आणि प्रेक्षक हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Dec 8, 2023, 06:40 PM IST
बॉलिवूडच्या चित्रपटांना 'झिम्मा 2'ची टक्कर! title=
(Photo Credit : PR Handover)

Jhimma 2 : बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित 'झिम्मा 2' या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही 'झिम्मा 2' ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहेत. एकदंरच हसताहसता डोळ्यांत चटकन पाणी आणणारा आणि रडतारडता मनमुराद हसवणारा 'झिम्मा 2' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय हे नक्की! 

चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, 'खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नाही. प्रेक्षक आपले खास दिवस 'झिम्मा २'बघून साजरे करत आहेत. 2-3 वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान वाटतेय. खरंतर 'झिम्मा 2' ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण 'झिम्मा'ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते. शिवाय 'झिम्मा 2' सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते. परंतु आता दोन आठवडे झाले आहेत. प्रेक्षक आजही 'झिम्मा 2'ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत 'झिम्मा 2' स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे. आपला चित्रपट यशस्वी दुसरा आठवड्यानंतर आता तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहोत. शोजही वाढले  आहेत. त्यामुळे आशा आहे, हा आठवडाही असाच हाऊसफुल्ल जाईल. अर्थात हे सगळे यश माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आनंद एल. राय, क्षिती जोग आणि जिओ स्टुडिओजची साथ लाभल्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो.'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

हेही वाचा : Feminism वरुन ट्रोल करणाऱ्याला नीना गुप्ता यांचं सडेतोड उत्तर; म्हणाला, 'जर तुम्ही नशेत...'

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कलर यल्लो प्रॅाडक्शनच्या सहकार्याने जिओ स्टुडिओज, चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचे ज्योती देशपांडे, आनंद एल राय आणि क्षिती जोग निर्माते आहेत. सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव, रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.