'आधी वजन कमी कर...', Jhanvi Kapoor चा तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली

 Jhanvi Kapoor 'त्या' व्हिडीओमुळे सोशल मीडियावर ट्रोल..   

Updated: Oct 7, 2022, 12:22 PM IST
'आधी वजन कमी कर...', Jhanvi Kapoor चा तो' व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली  title=

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर (Jhanvi Kapoor) कायम तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलमुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. आता देखील अभिनेत्रीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर (Jhanvi Kapoor social media) तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिनेत्री क्रिकेट खेळताना दिसत आहे. काही चाहत्यांना जान्हवीचा नवा प्रयत्न आवडला आहे तर, काहींनी मात्र सोशल मीडियावर अभिनेत्री खिल्ली उडवली आहे. पण जान्हवीने अभिनय सोडून हातात बॅट का घेतली असा प्रश्न तुम्हाला देखील पडला असेल. (Jhanvi Kapoor  cricket)

आगामी सिनेमात जान्हवी महिला क्रिकेटरच्या भूमिकेत दिसणार आहे. पण जान्हवीच्या व्हिडीओवर अनेकांनी कमेंट करत अभिनेत्रीला ट्रोल केलं. एक युजर व्हिडीओवर कमेंट करत म्हणाला, 'आधी वजन कमी कर...' सध्या अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

जान्हवीने का घेतली हातात बॅट? 
जान्हवी कपूर तिच्या आगामी 'मिस्टर अँड मिसेस माही' (Mr. and Mrs. Mahi) सिनेमाची तयारी करत आहे. सिनेमा जान्हवी राजकुमार रावसोबत दिसणार आहे. सिनेमात जान्हवी एका महिला क्रिकेटरची भूमिका साकारत आहे आणि त्यामुळेच ती रात्री उशिरापर्यंत नेटवर फलंदाजीचा सराव करत असल्याचं कळत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

व्हायरल व्हिडीओमध्ये जान्हवी पांढऱ्या आणि हलक्या जांभळ्या रंगाच्या कपड्यांमध्ये दिसत आहे. जेणेकरून त्याला चित्रपटाच्या गरजेनुसार फलंदाजी करता येईल. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनद्वारे 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमाची निर्मिती केली जात आहे. 

जान्हवी कपूरने तिच्या करिअरची सुरुवात 'धडक' (dhadak) सिनेमातून केली होती. यानंतर तिने 'गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल' आणि 'गुडलक जेरी' सारख्या सिनेमात काम केले.