'Taarak Mehta...' बोल्ड सेक्रेटरीला पाहून दयाबेनला देखील विसरेल जेठालाल

जेठालालच्या आयुष्यातील दयाबेनची जागा सेक्रेटरीने घेतली तेव्हा...

Updated: Sep 25, 2021, 09:41 AM IST
'Taarak Mehta...' बोल्ड सेक्रेटरीला पाहून दयाबेनला देखील विसरेल जेठालाल  title=

मुंबई : गेल्या 13 वर्षांपासून 'तारक मेहता का उल्टा चष्मा' प्रेक्षकाचं मनोरंजन करत आहे. मालिकेतील टप्पूसेना आणि गोकूळधाम परिवारातील एकता प्रेक्षकांच्या फार जवळचा विषय ठरली आहे. मालिकेत जेठालाल, दया, चंपकचाचा, बबीताजी, भिडे-अय्यर यांच्यासह बरेच कलाकार आहेत. प्रत्येक कलाकाराने चाहत्यांच्या मनात एक वेगळी जागा निर्माण केली. पण काही कलाकारांनी मात्र मालिकेला राम राम ठोकला. जरी अनेक कलाकारांनी तारक मेहता मालिकेमध्ये काही काळ काम केले असले तरी त्यांना इतकी लोकप्रियता मिळाली की आजही चाहते  सोशल मीडियावर त्यांचे जुने भाग पाहात असतात. 

असाच एक जुना भाग स्वीटीचा आहे. काही भागांमध्ये, स्वीटी जेठालालची सेक्रेटरी बनते. अभिनेत्री सुरभी चंदनाने मालिकेत जेठालालच्या सेक्रेटरीची भूमिका बजावली. जेठालाल आणि माझं अफेयर असल्याचा दावा  स्वीटी वारंवार करताना दिसली. त्यामुळे जेठालालच्या घरी मोठं संकट आलं. पणी सुरभी जेठालालच्या सेक्रेटरीची भूमिका जास्त काळ करू शकली नाही. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

एका मुलाखतीत सुरभीने सांगितलं होतं की, 'मला स्वतःचे डायलॉग लक्षात ठेवण्यासाठी अडचणी येत होत्या. त्यामुळे मला रिप्लेस करण्याच्या चर्चा सुरू होत्या..' सुरभीबद्दल सांगायचं झालं ती प्रचंड हॉट आणि ग्लॅमरस आहे. तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेनंतर सुरभीने  'एक ननद की खुशियों की चाभी..मेरी भाभी' मालिकेत भूमिका साकारली. 

सुरभीच्या लोकप्रियतेत वाढ झाली जेव्हा ती 'कबूल' हे मालिकेच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस आली.  सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी सुरभी कायम सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.