Jayant Sawarkar Death: मराठीतले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे नुकतेच निधन झाले आहे. वयाच्या 88 वर्षी त्यांचे निधन झाले असून त्यांच्या निधनानं सर्वत्र शोककळा पसरली आहे. नाटक, चित्रपट, मालिका ते अगदी आजच्या जमान्यातील ओटीटी प्लॅटफोर्मवरही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. त्यांच्या निधनावर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. मराठी कलाकारांनीही त्यावर शोक व्यक्त केला असून यावेळी नाटक, चित्रपट-मालिकेतील कलाराकांनी जयंत सावरकर यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सोबतच त्यांनी सोशल मीडियावर पोस्टही शेअर केल्या आहेत. त्यातून अनेक कलाकारांनी त्यांच्या निधनावर भाष्य केले आहे. यावेळी मंगेश देसाई यांनी दिलेल्या बाईटनुसार, समोर धक्कादायक वास्तव बाहेर आले आहे. यावेळी त्यांनी Zee 24 Taas ला दिलेल्या बाईटनुसार सांगितले की त्यादिवशी वडापाव खाल्ला होता आणि त्यामुळे त्यांना एसिडिटी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार असे कळते की जयंत सावरकर यांची तब्येत ही प्रचंड उत्तम होती सोबतच त्यांच्याबद्दल कोणतीच वैद्यकीय तक्रार नव्हती. त्यामुळे त्यांच्या निधनाच्या बातमीनं सर्वांनाच धक्का बसला आहे. यावेळी अभिनेता, निर्माता मंगेश देसाई म्हणाला की, ''वयाच्या 88 व्या वर्षीही एक्टिव्ह असणारे ज्येष्ठ अभिनेते उर्फ अण्णा हे नेहमी पथ्य पाळणारे आहाराकडे अजिबात दुर्लक्ष न करणारे,दररोज सकाळी मॉर्निंग वोकला जाणारे. पण एक वडापाव निमित्त ठरला आणि त्याने एसीडीटी झाली त्यानंतर त्यांना एडमिट करण्यात आलं मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बहुदा त्यांना जाणीव झाली होती की आपल्या एक्सिट ची वेळ झालीय. अण्णा गेले हे पटतच नाहीये त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. अण्णा म्हणजे आमच्या देखील वयाला लाजवणारे असे होते. फिटनेस वर नेहमीच लक्ष देण्यास सांगणारे ते म्हणजे अण्णा. अण्णा जाण्याने मोठी पोकळी निर्माण झाली आहे.''
हेही वाचा - संघर्ष कुणालाही चुकला नाही! यातून प्रत्येक संधीचं सोनं करत 'हा' अभिनेता देतोय बॉलिवूडच्या खान मंडळींना टक्कर
जयंत सावरकर यांचा जन्म हा 3 मे 1936 झाला होता. ते मुळचे गुहागरचे होते. त्यांच्या वडिलांचा व्यवसाय होता. ते 21 भावंडांमध्ये सर्वात लहान होते. त्यांचा मोठा भाऊ मुंबईत नोकरी करत होता म्हणून तेही मुंबईला आले. त्यानंतर ते आपल्या भावासोबत गिरगावात राहू लागले होते. त्यांनीही काही काळ नोकरी केली होती. सोबतच त्यांनी नाटकातही पुर्णवेळ काम करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना पांठिबा दिला होता.
त्यांनी 97 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते त्याचबरोबर त्यांनी फक्त मराठीच नाही तर हिंदी चित्रपटांमधूनही कामं केली होती.