Jaya Bachchan on Budget 2024 : बॉलिवूड अभिनेत्री जया बच्चन आणि भारतीय राजकारणात एक मोठं नाव आहे. अभिनय क्षेत्रातील इतक्या मोठ्या करिअरनंतर त्या राजकारणात आल्या. जया बच्चन या नेहमीच स्पष्ट बोलताना दिसतात. पापाराझींसोबत गप्पा मारतानाचे त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतात. जया बच्चन या कधीच कोणाला घाबरत नाही तर त्यांना जे वाटतं ते बोलताना दिसतात. सध्या जया यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2024 वर प्रतिक्रिया दिली आहे.
24 जुलै रोजी बजेट समोर आल्यानंतर एक दिवसात जया बच्चन यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्या म्हणाल्या की त्यांना केंद्रीय अर्थसंकल्प 2024 विषयी काही बोलायचं नाही आहे. कारण तो तितका महत्त्वाचा विषय नाही. त्यांनी म्हटलं की 'ही सगळी वचन ही कागदांपर्यंत मर्यादित राहतील.' जया यांनी पुढे म्हटलं की 'माझी यावर कोणतीही प्रतिक्रिया नाही. यावर काही प्रतिक्रिया देण्यासारखं हे बजेट होतं का? हे फक्त एक नाटक आहे, जे कागदावर राहतं, ते कधीच पूर्ण होत नाही.'
दुसरीकडे 'एनडीटीव्ही' ला दिलेल्या मुलाखतीत जया बच्चन यांनी सांगितलं की नुकत्याच आलेल्या बजेटमध्ये इंडस्ट्रीसाठी काही लिहिलेलं नाही. जया बच्चन यांनी म्हटलं की केंद्रिय बजेट 2024 मधून न कलाकार आणि नाही इंडस्ट्रीला काही फायदा झाला? या प्रकरणात त्यांनी म्हटलं की 'कलाकार, आमच्यासाठी काही नाही. आमच्या इंडस्ट्रीसाठी काही नाही. देशासाठी काही नाही.'
जया बच्चन यांच्या खासगी आयुष्याविषयी बोलायचे झाले तर त्या तेव्हा पासून चर्चेत आहेत जेव्हा पासून अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये घटस्फोट होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. इतकंच नाही तर जेव्हा जया या त्यांचा नवरा अर्थात अमिताभ बच्चन, मुलगा अभिषेक बच्चन, मुलगी श्वेता बच्चन, नातू अग्स्त नंदा आणि नात नव्या नवेली नंदा यांच्यासोबत अंबानींच्या लग्नात दिसल्या होत्या. तर दुसरीकडे ऐश्वर्या आणि आराध्या एकत्र स्पॉट झाले होते.