Trade Analysis: 7 लाख तिकीटं बुक, भल्या पहाटे शो; पहिल्याच दिवशी 'जवान' मोडणार इतके रेकॉर्ड

Jawan Box Office: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे जवान या चित्रपटाची. त्यातून हा चित्रपट उद्याच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यातून यावेळी चर्चा आहे ती म्हणजे हा चित्रपट पहिल्यात चार दिवसात कोट्यवधींची कमाई करू शकतो याची. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 6, 2023, 06:05 PM IST
Trade Analysis: 7 लाख तिकीटं बुक, भल्या पहाटे शो; पहिल्याच दिवशी 'जवान' मोडणार इतके रेकॉर्ड title=
jawan can collect unexpectedly high amount on first day first show

Jawan Box Office: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे शाहरूख खानच्या जवान या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र चर्चेत आहे. हा चित्रपट पहिल्याच दिवशी रेकॉर्ड ब्रेक कमाई होऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे हा चित्रपट पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर मोठ्या प्रमाणात कमाई करू शकेल असं म्हटलं जाते आहे. यावेळी शाहरूखच्या जवान या चित्रपटानं एडव्हान्स बुकींगमध्ये चांगलीच बाजी मारली आहे. त्यामुळे वर्ल्ड वाईल्ड चित्रपटांमध्ये हा चित्रपट चांगली कमाई करू शकतो, असे म्हटलं जाते आहे. त्यामुळे याची सध्या चांगलीच चर्चा रंगलेली आहे. बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार, जवान हा चित्रपट ट्रे़ड एक्सपर्ट अक्षय राठी यांच्यानुसार या चित्रपटाची ओपनिंग ही ऐतिहासिक होऊ शकते. पहिल्याच चार दिवसांत हा चित्रपट 400 कोटींची कमाई करू शकतो. पहिल्याच दिवशी जर का या चित्रपटाची कमाई ही चांगली राहिली तर हा चित्रपट पुढेच जिवसही चांगली कमाई करू शकतो. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आतापर्यंत या चित्रपटानं 7 लाखांच्या वर एडव्हान्स बुकिंग केले आहे. त्यातून या एडव्हान्स बुकींग मधून जवाननं आत्तापर्यंत 17 कोटी रूपये कमावले आहेत. त्यामुळे या हिशोबानं पहिल्याच दिवशी हा चित्रपट फार मोठी कमाई करू शकतो. हा चित्रपट जवळजवळ 60 कोटी रूपये कमावू शकतो. या चित्रपटातून शाहरूख खान, नयनतारा, विजय सेतूपती आणि दीपिका पादूकोणही दिसणार आहेत. त्यामुळे या चित्रपटाचा आगाळावेगळा विषय पाहाता आणि या चित्रपटाची तगडी स्टारकास्ट पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करू शकतो. यावेळी या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगलेली आहे. 

हा चित्रपट गेल्या वर्षभरापासून प्रेक्षकांच्या प्रतिक्षेत होता. त्यातून आता इतक्या वेळाच्या प्रतीक्षेनंतर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाचे शुटिंग सुरू असताना या चित्रपटाचे अनेक छोटेमोठे व्हिडीओ आणि फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले होते. अशातच आता चर्चा होती ती म्हणजे शाहरूख खानच्या लुकची. त्यानंतर या चित्रपटातला शाहरूख खानचा लुकही चांगला व्हायरल झाला होता. ज्याची सर्वत्र जोरात चर्चा रंगली होती. त्यामुळे या चित्रपटाची उत्सुकता ही अधिकच वाढली होती. 

हेही वाचा : Viral Video: शाहरुख समोर येताच दिसले सनीच्या मुलगा-सुनेचे संस्कार; सर्वत्र होतेय कौतुक

डॉन हा शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन यांनी गाजवलेला रोल हा लवकरच रणवीर सिंग करणार आहे. यावर्षी शाहरूखचा पठाण हा चित्रपटही प्रचंड गाजला होता. त्यामुळे सर्वत्र त्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळाली होती.