Japan Artist Reel on Baharala Ha Madhumas: 28 एप्रिलला 'महाराष्ट्र शाहीर' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांनी तूफान प्रतिसाद दिला आहे. बॉक्स ऑफिसवरही या चित्रपटानं चांगला गल्ला भरला आहे. सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे यांनी आपले आजोबा आणि महाराष्ट्राचे लाडके कलाकार शाहीर साबळे यांचा जीवनपट प्रेक्षकांसमोर आणला आहे. या चित्रपटातून केदार शिंदे यांची लेक सना शिंदेही प्रमुख भुमिकेत आहेत. हा तिचा पहिलाच चित्रपट असून सध्या या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. महाराष्ट्राचा लाडका अभिनेता अंकुश चौधरीनं (Ankush Choudhary) या चित्रपटातून शाहीर साबळेची भुमिका निभावली आहे. सना शिंदे आणि अकुंश चौधरी यांच्या भुमिकेचे सर्वत्र कौतुक झाले आहे.
या चित्रपटातील बहरला हा मधुमास हे गाणं प्रेक्षकांनी अक्षरक्ष: डोक्यावर उचलून धरला आहे. इन्टाग्रामवर चाहते या गाण्याचे रिल्स बनवत आहेत. सध्या हे रिल्सही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. त्यातून फक्त भारतातील चाहतेच नाही तर जगभरातील अनेक चाहते या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत सोबतच या गाण्यावर रिल्सही बनवत आहेत. सैराटमधील झिंगाट या गाण्यानंतर आता बहरला हा मधुमास हे गाणं सोशल मीडियावर चांगलं गाजलं आहे. अजय-अतुल यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं असून गायिका श्रेया घोषाल (Sherya Ghoshal) हिनं हे गाणं गायलं आहे.
हेही वाचा - 'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरूद्ध ट्रोल... नेमकं काय घडलं?
या गाण्यावर एका जपानी डान्सरनंही ठेका धरला आहे. काकेताकू (Japan Artist Dances on Baharala Ha Madhumas) असं या कलाकाराचे नावं आहे. त्यानं आपल्या सहकलाकारासह त्याच डान्स स्टेप्समध्ये त्यांच्या स्टाईलमध्ये गाण्यावर ठेका धरला आहे. पिरो असं या सहकलाकाराचं नावं आहे. या दोघांनी हा व्हिडीओ रस्त्यावर शूट केला आहे. हा व्हिडीओ केदार शिंदे आणि सना शिंदे यांनी त्यांच्या इन्टाग्राम स्टोरीवरूनही शेअर केला आहे. ज्यावर त्यांनी त्यांना हा व्हिडीओ आवडला असल्याचेही सांगितले आहे. या गाण्यावर नेटकरी कमेंट्स करताना दिसत आहेत. याआधी युट्यूबर किली पॉलनंही बहरला हा मधुमास नवा या गाण्यावर ठेका धरला होता.
आपले मराठी कलाकारही या गाण्यावर ताल धरताना दिसत आहेत. सोबतच शिल्पा शेट्टीनंलाही (Shilpa Shetty on Baharala Ha Madhumas) या गाण्यावर नाचण्याचा मोह आवरता आलेला नाही. भरत जाधवही या गाण्यावर थिरकला होता. सध्या हे व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल झाले आहेत. त्यामुळे सध्या हे व्हिडीओज सगळीकडेच चर्चेचा विषय ठरले आहेत.