'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरूद्ध ट्रोल... नेमकं काय घडलं?

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' ही मालिका प्रेक्षकांमध्ये भलतीच लोकप्रिय झाली आहे. सध्या या मालिकेतून एका स्त्री व्यक्तिरेखेची (Milind Gawali) एन्ट्री झाली आहे. त्यामुळे अनिरूद्ध मात्र ट्रोल झाला आहे. नक्की काय घडलंय, या लेखातून जाणून घेऊया. 

गायत्री हसबनीस | Updated: May 12, 2023, 06:36 PM IST
'आई कुठे काय करते' मालिकेतील अनिरूद्ध ट्रोल... नेमकं काय घडलं? title=
फाईल फोटो

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' ही मालिका सध्या सगळीकडेच लोकप्रिय ठरली आहे. सध्या ही मालिका भलतीच लोकप्रिय (Aniruddha) ठरली असून या मालिकेतील विलन अनिरूद्ध हा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आला आहे. या मालिकेतील पात्रं ही अनेकदा ट्रोल होतात त्यामुळे त्यांची बरीच चर्चा होताना दिसते. 2019 पासून ही मालिका घरोघरी पाहिली जाते. आता या मालिकेची कथा ही वेगळीच वळणं घेते आहे. अनिरूद्धचं विवाहबाह्य संबंध दाखवल्यानंतर अरूंधतीचे लग्नही या मालिकेतून (Trolled) दाखविण्यात आले आहे. परंतु आता या मालिकेतून एका वेगळ्याच नव्या पात्राची एन्ट्री होणार आहे ज्यामुळे अनिरूद्ध हे पात्र ट्रोल झालं आहे. (aniruddha from aai kuthe kay karte get trolled as a new female character introduced in serial)

अरूंधतीशी लग्न मग संजनाशी एक्स्ट्रा मॅरिटियल अफेअर इथपासून पुढे या मालिकेची कथा गेल्यानंतर आता आई कुठे काय करते या मालिकेत एका वेगळ्या स्त्री व्यक्तिरेखेची एन्ट्री होणार आहे. अरूंधती दुसरा नवरा आशुतोषची ही बहीण असून अनिरूद्धची ती बिझनेस पार्टनर आहे. 'स्टार प्रवाह'च्या इन्टाग्रामवरून समोर आलेल्या प्रोमोत काहीसं असंच घडताना दिसते आहे. त्यामुळे या एपिसोडची प्रेक्षकांनी उत्सुकता लागून राहिली आहे. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच चर्चेचा विषय ठरला आहे. या पात्राचं नाव वीणा आहे. या भूमिकेत अभिनेत्री खुशबू तावडेनं (Khushboo Tawde) एन्ट्री घेतली आहे. 

त्यामुळे आता यापुढे या मालिकेत या व्यक्तिरेखेच्या एन्ट्रीनंतर काय घडणार याबद्दल प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरू झाली आहे. संजना, अरूंधतीनंतर आता अनिरूद्ध या नव्या मुलीशी लग्न करणार का, असे प्रश्न उपस्थित करत अनिरूद्धला ट्रोल केले आहे. नेटकऱ्यांनी म्हटलं आहे की, आता काय आजोबा तिसऱ्यांदा लग्न करणार का? तर दुसऱ्या एका युझरनं म्हटलंय की, वीणासोबत अनिरूद्धचं लग्न दाखवा. तर अशाच एका युझरनं म्हटलंय की, आता काय अप्पाचं लग्न दाखवणार? अनिरूद्धची मुलगी ईशा आणि अनिष यांचा साखरपुडा होताना आपण पाहतो आहोत. त्याचवेळी वीणाची एन्ट्री होते. 

हेही वाचा - हा Dance Video पाहून नेटकरी म्हणाले, ''अरे, हे तर नेपाळचे Shahrukh-Kajol''

'आई कुठे काय करते' ही मालिका गेल्या चार वर्षात भलतीच लोकप्रिय झाली आहे. या मालिकेला अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. या मालिकेतील अभिनेता मिलिंद गवळी आणि मधूराणी गोखले-प्रभूलकर सोशल मीडियावरही प्रचंड एक्टिव आहेत. ते आपल्या चाहत्यांनाही अपडेट करत असतात. मिलिंदच्या पोस्टही अनेकदा व्हायरल होतात. सध्या ही मालिका जगभरात जिथे जिथे या मालिकेचे चाहते आहेत ते ही मालिका अगदी आवडीनं पाहतात.