नश्वर जगाचा त्याग करत देखणी मराठमोळी अभिनेत्री जगतेय मीरेसारखं आयुष्य

Janmashtami 2024 : कृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानं संपूर्ण देशासह जगभरात उत्साह पाहायला मिळत असतानाच एक अनोखी कहाणीसुद्धा सर्वांसमोर आली आहे.   

सायली पाटील | Updated: Aug 26, 2024, 12:29 PM IST
नश्वर जगाचा त्याग करत देखणी मराठमोळी अभिनेत्री जगतेय मीरेसारखं आयुष्य title=
(छाया सौजन्य- गोवर्धन इकोविलेज) / janmashtami 2024 Anupama fame actress Anagha Bhosale becomes lord krishna devotee se her post

Janmashtami 2024 : कृष्णभक्तीत लीन होणं म्हणजे नेमकं काय? असं विचारलं असता अनेक उदाहरणं दिली जातात. या साऱ्यामध्ये सर्वात महत्त्वाचं उदाहरण असतं ते म्हणजे श्रीकृष्णाच्या निस्सिम भक्त असणाऱ्या मीराबाईचं. मीरेनं सर्वस्व कृष्णासाठी अर्पण केलं, सर्व लालसांचा त्याग करून ही मीरा जगाच्या दृष्टीक्षेपात असेपर्यंत सदैव कृष्णनामातच तल्लीन राहिल्याचं पाहायला मिळालं. कोणत्याही अपेक्षेशिवास आपल्या आराध्याची सेवा आणि भक्ती करणं म्हणजे नेमकं काय, हे मीरेनं दाखवून दिलं आणि याच मीरेचं आणखी एक रुप आता अनेकांना या आधुनिक युगातही पाहायला मिळत आहे. 

मीरेसारखंच कृष्णभक्तीत तल्लीन होणारा हा चेहरा आहे एका अभिनेत्रीचा. कलाविश्व, प्रसिद्धी आणि नश्वर गोष्टींचा त्याग करून अनघा भोसले नावाच्या एका अभिनेत्रीनं वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी अध्यात्माची वाट निवडली आहे. 'अनुपमा' या मालिकेतून अनघा प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिनं साकारलेल्या भूमिकेला बरीच लोकप्रियता मिळाली. पण, या विश्वात अनघा रमली नाही. 

कृष्णावरील भक्तीपोटी तिनं अखेर हीच वाट निवडली आणि या निर्णयानंतर अनघाचं रुपच बदललं. मीरेनं ज्याप्रमाणं आपल्या देवतेप्रती असणारी ओढ पाहता दैनंदिन आयुष्यातच काही सुखावह बदल केले, अगदी तसेच बदल अनघानंही केले आणि तिनं हे अध्यात्मिक रुप धारण केलं. कपाळी टीळा, चेहऱ्यावर स्मितहास्य आणि सूती साड्या आणि मुखी कृष्णाचच नाव अशी ही अनघा सध्या सर्वांसमोर येते. 

हेसुद्धा वाचा : गणेशोत्सवासाठी Mumbai Goa Highway वर वाहतूकबंदी? चाकरमान्यांवर 'असा' होणार परिणाम 

सोशल मीडियाच्या माध्यमातूनही अनघा सदैव कृष्ण आणि कृष्णाच्या अवतीभोवती फिरणारं तिचं विश्व सर्वांसमोर आणत असते. चराचरामध्ये कृष्णाचं अस्तित्वं आहे, विश्वातील प्रत्येक कण हा कृष्णलिलांनीटच व्यापला आहे अशा आशयाचे कॅप्शन अनघा तिच्या पोस्टना देत असते. तिची ही कृष्णभक्ती पाहताना अनेकांनाच तिचा हेवा वाटतो.