सिंगल असल्याचं स्पष्ट केल्यानंतर जान्हवी कपूरचा 'हा' फोटो व्हायरल

बॉलिवूडच्या यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूरचे नाव नक्कीच समाविष्ट आहे. 

Updated: Aug 7, 2022, 12:26 PM IST
सिंगल असल्याचं स्पष्ट केल्यानंतर जान्हवी कपूरचा 'हा' फोटो व्हायरल title=

मुंबई : बॉलिवूडच्या यंग आणि टॅलेंटेड अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूरचे (Janhvi Kapoor) नाव नक्कीच समाविष्ट आहे. सध्या तिचं प्रोफेशनल लाईफ चांगलं चाललंय. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'गुड लक जेरी' या चित्रपटात तिने आपल्या अभिनयाने सर्वांची मने जिंकली आहेत. जान्हवी ही सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकताच जान्हवीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.  

जान्हवीचा हा फोटो इन्स्टंट बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या फोटोत जान्हवीनं ब्रालेट परिधान केल्याचं दिसत आहे. जान्हवीनं केस मोकळे सोडले असून जान्हवीनं काळ्या रंगाची शॉर्ट्स परिधान केली आहे. जान्हवीनं हा फोटो वर्क आउट केल्यानंतर क्लिक केल्याचे म्हटलं जातं आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

जान्हवी कपूरबद्दल अनेकदा बातम्या येतात की ती एखाद्या स्टार किंवा बिझनेसमनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. पण, ही केवळ अफवा आहे. खरंतर, जान्हवीनं अलीकडेच तिच्या खासगी आयुष्याबद्दल खुलासा केला आहे. यावेळी जान्हवीनं सांगितलं की ती सिंगल असून आनंदी आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की 'कॉफी विथ करण 7' मध्ये अभिनेत्रीनं तिच्या सिंगल असल्याबद्दल सांगितलं होतं.

जान्हवीचा लेटेस्ट स्टेटस असा आहे की, 'ती सिंगल आहे आणि ती खूप आनंदी आहे. पण तिला कधीकधी एकटेपणा जाणवतो असंही तिनं म्हटलं आहे. करण जोहरच्या लोकप्रिय शो 'कॉफी विथ करण 7' मध्ये उपस्थित असतानाही जान्हवीने सिंगल असल्याचं मान्य केलं. जर कोण तुमच्या जवळ यायचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यापासून दूर राहिलेलं बरं, असंही तिने स्पष्ट केलं.

कधी कधी एकटेपणा जाणवतो
नुकत्याच 'कॉफी विथ करण 7'मध्ये तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलताना जान्हवी म्हणाली, "मी सिंगल असल्याने आनंदी आहे. कधीकधी मला एकटेपणा जाणवतो. मी याला कंटाळले आहे. त्याचबरोबर  ज्यांना जान्हवीला डेट करायचं आहे त्यांच्यासाठी तिने स्पष्टपणे सांगितले की, ''मी फक्त त्या गोष्टींकडे आकर्षित झाले आहे. ज्यांना खरोखर निश्चित करणं आवश्यक आहे. मी याला कंटाळले आहे.  जर तुम्हाला हीलिंग हवे असतील तर दुसरीकडे जा. इथे येऊ नका.''