जान्हवी आणि ईशानच्या 'धडक'ची कोटींची उड्डाणे

 सिनेमाचं पहिल्या दिवसाच कलेक्शन ८ कोटी ७१ लाख इतकं होत तर दुसऱ्या दिवशी ११.०४ कोटी रुपये कमाई केली.

Updated: Jul 22, 2018, 03:15 PM IST
जान्हवी आणि ईशानच्या 'धडक'ची कोटींची उड्डाणे  title=

मुंबई : बॉक्स ऑफिसवर जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरच्या जोडीची सध्या चर्चा आहे. या नवोदीत जोडीच्या 'धडक' सिनेमाची जादू बॉक्स ऑफिसवर पाहायला मिळतेय. या सिनेमाने पहिल्या दिवसाप्रमाणेच दुसऱ्या दिवशी दणक्यात कलेक्शन केलंय. सिनेमाचं पहिल्या दिवसाच कलेक्शन ८ कोटी ७१ लाख इतकं होत तर दुसऱ्या दिवशी ११.०४ कोटी रुपये कमाई केली. सिनेमाने आतापर्यंत १९.७५ कोटी इतकी कमाई केलीयं.  ट्रेण्ड अॅनालिस्ट तरण आदर्शने धडक कलेक्शनची माहीती ट्विटरवरून दिलीयं.

पहिल्याच दिवशीच रेकॉर्ड 

जान्हवी कपूरच्या या सिनेमाने आलिया भट्टचा डेब्यू सिनेमा स्टुडंट ऑफ द इयर (८ कोटी) चा फर्स्ट डे कलेक्शनला मागे टाकलंय. एवढंच नव्हे तर जान्हवी ही न्यूकमर म्हणून सर्वाधिक कलेक्शन करणारी अभिनेत्री ठरली. धडक सिनेमा एकूण ७ ते ८ कोटींची कमाई करु शकतो असा अंदाज लावला जात होता. ट्रेण्ड अॅनालिस्टचा हा अंदाज खरा ठरला असून धडकने ८ कोटीहून अधिक कमाई केलीयं.  हा सिनेमा शशांक खेतान याने दिग्दर्शित केलायं.