असा रंगला ईशा देओलचा 'गोदभराई'चा कार्यक्रम !

धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल लवकरच आई होणार आहे. नुकताच मुंबईतील राधा रास बिहारी मंदिरात 'गोदभराई' म्हणजेच तिच्या डोहाळे जेवणाचा एक कार्यक्रम पार पडला. 

Updated: Aug 24, 2017, 05:52 PM IST
असा रंगला ईशा देओलचा 'गोदभराई'चा कार्यक्रम !  title=

मुंबई : धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी आणि अभिनेत्री ईशा देओल लवकरच आई होणार आहे. नुकताच मुंबईतील राधा रास बिहारी मंदिरात 'गोदभराई' म्हणजेच तिच्या डोहाळे जेवणाचा एक कार्यक्रम पार पडला. 

ईशाच्या चेहर्‍यावरील 'प्रेगन्सी ग्लो' आणि या सोहळ्यात घातलेला गुलाबी रंगाचा लेहंगा तिच्यावर खुलून दिसत होता.  ईशा देओलच्या 'गोदभराई'मध्ये तिच्या दोन्ही परिवारातील लोकं, जवळच्या मित्र मैत्रणी सहभागी झाल्या होत्या. 

 

Getting ready for the Godh bharai ceremony ! Hair done make up done  #GodhBharai

A post shared by Esha Deol (@imeshadeol) on

 

'गोदभराई'च्या सोहळ्यासाठी तयार होताना ईशानेही काही फोटो शेअर करून तिच्या फॅन्सना काही अपडेट्स दिले.  इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना तिने लिहले होते, ' गोदभराईसाठी तयार होत आहे.  हेअरस्टाईल झाली, मेकअप झाला.. ' 

 

Godh bharai for my darling @imeshadeol ! May the universe conspire to bless our babieeeeeees always!! #preggerbesties #bumpbuddies #bff

A post shared by Shilarna Vaze aka Chef Chinu (@chefchinugaiagourmet) on

 

ईशाच्या गोदभराईच्या कार्यक्रमासआठी प्रसिद्ध बॉलिवूड ड्रेस डिझायनर नीता लुल्हा यांनी लेहंगा डिझाईन केला होता.  गोदभराईच्या कार्यक्रमानंतर तिची मैत्रिण शिलार्ना हीने देखील एक खास फोटो शेअर केला आहे. 

शिलार्ना देखील लवकरच आई होणार आहे. तिने ईशासोबत 'ना तुम जानों ना हम' या चित्रपटात झळकली होती. शिलार्ना शेफ आहे.