नवाजुद्दीनचा 'बाबूमोशाय बंदूकबाज' इंटरनेटवर लीक

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी 'बाबूमोशाय बंदूकबाज' या सिनेमाची आणि त्यातील बोल्ड सीन्सची जोरदार चर्चा रंगली आहे. या शुक्रवारी हा सिनेमा रिलीज होणार आहे. अशातच या सिनेमाला मोठा फटका बसला आहे.

Updated: Aug 24, 2017, 04:39 PM IST
नवाजुद्दीनचा 'बाबूमोशाय बंदूकबाज' इंटरनेटवर लीक title=

मुंबई : नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी 'बाबूमोशाय बंदूकबाज' या सिनेमाची आणि त्यातील बोल्ड सीन्सची जोरदार चर्चा रंगली आहे. या शुक्रवारी हा सिनेमा रिलीज होणार आहे. अशातच या सिनेमाला मोठा फटका बसला आहे.

या सिनेमाची कॉपी इंटरनेटवर लीक झाली होती. हा सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच हे झाल्याने याचा सिनेमाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात डाउनलोड लिंक शेअर झाली होती.

'बाबूमोशाय बंदूकबाज' या सिनेमात नवाजुद्दीन हा मुख्य भूमिकेत असून यात अनेक बोल्ड सीन्सचा भडीमार आहे. नवाजुद्दीनसोबत हे पहिल्यांदाच सिनेमाची कॉपी लिक होण्याची घटना घडली नाही. याआधी 'मांझीः द माउंटेन मैन' हा सिनेमाही इंटरनेटवर लीक झाला होता. 

या सिनेमात अभिनेत्री बिदिता सोबत नवाजुद्दीनचे अनेक इंटिमेट आणि किसिंग सीन आहेत. यामुळेच सेन्सॉर बोर्डाने यातील अनेक सीनवर कात्री लावली. सेन्सॉर बोर्डाने चित्रपटातील ४८ सीन कापण्यास सांगितले होते. पण नंतर एकूण ८ सीन कट केल्यावर  सिनेमाला प्रमाणपत्र दिले गेले.