कतरिनाच्या लग्नात सलमानची हजेरी, भर मंडपात कतरिनाचा हात धरत...पाहा व्हायरल फोटो

त्यात आता समोर आलेला फोटो सगळ्यांनाच आश्चर्यचकीत करणारा आहे.

Updated: Dec 13, 2021, 04:11 PM IST
कतरिनाच्या लग्नात सलमानची हजेरी, भर मंडपात कतरिनाचा हात धरत...पाहा व्हायरल फोटो title=

मुंबई : विकी कौशल आणि कतरिना कैफ गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या लग्नाच्या बातम्यांमुळे चर्चेत होते. अखेर दोघांनी 9 डिसेंबर रोजी राजस्थानमध्ये लग्न केलं. 

दोघांनीही सगळ्यांपासून लपवून, तसेच कमी आणि महत्वाच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नं केलं. त्यांच्या लग्नात पाहुण्यांना फोन वापरण्याची परवानगी नव्हती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

तसेच कोणत्याही परिस्थितीत लोकांना सोशल मीडियावर फोटो अपलोड करण्यासाठी मनाई करण्यात आली आहे.

त्यामुळे लग्नातील कित्येक फोटो हे अद्याप गुलदस्त्यात आहेत. त्यात आता एक असा फोटो व्हायरल होत आहे. ज्यात सलमान खान लग्नमंडपात दिसून येत आहे. कतरिना आणि सलमान यांच्या नात्याबाबत सुरुवातीला अनेक चर्चा झाल्या. 

दोघेही एकमेकांना डेट करत असल्याचं ही बोललं जात होतं. पण सिनेमांमध्ये एकत्र झळकणारी ही जोडी लग्नात ही एकत्र असं अनेकांना वाटत होतं. कतरिनाच्या लग्नात तिचा खूप जवळचा व्यक्ती सलमान हजेरी लावणार याची खात्री देखील अनेकांना होती. पण कतरिनाने सलमानला आमंत्रण दिलं नसल्याचं बोललं जाऊ लागलं. 

त्यात आता समोर आलेला फोटो सगळ्यांनाच आश्चर्यचकीत करणारा आहे. या फोटोत सलमानने कतरिनाचा हात धरला आहे.

कतरिनाच्या लग्नाची बातमी समोर आल्यापासूनच सलमान खानवर अनेक मीम्स बनत आहे. हा फोटो देखील त्यातील एक आहे. ज्यात विकीच्या चेहऱ्याच्या जागी सलमानचा चेहरा लावण्यात आला आहे. हा फोटो लग्नमंडपातील आहे.   

Vicky Kaushal and Katrina Kaif posts mehendi-sangeet pictures on Instagram.(Instagram)

या फोटोच एडीट पाहता हा खरा फोटो असल्याचा भास अनेकांना होत आहे. विकी आणि कतरिना यांनी लग्न केल्यानंतर त्यांचे फोटो खूपच व्हायरल होत आहेत.