मुंबई : बॉलीवूड अभिनेता इरफान खान गेल्या काही महिन्यांपासून लंडनमध्ये आहे. आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी गेला होता. या वेळेत चाहते इरफान खानच्या तब्बेतीची काळजी करत होते. अशावेळी इरफान खानने स्वतः ट्विट करून आपल्या तब्बेतीची माहिती दिली आहे. इरफान खान न्यूरोएंडोक्राइन ट्यमूर झाला असून त्याचा परदेशात उपचार सुरू आहे. अशात 2 महिन्यांनी या ट्विट करून 'कारवां' या सिनेमाची माहिती दिली आहे.
इरफान खानने केलेल्या ट्विटमधून हे स्पष्ट झालं आहे की, सिनेमाबाबत तो फार एक्साइटेड आहे. मात्र त्याने खंत व्यक्त केली आहे की, सिनेमाच्या प्रमोशनमध्ये तो सहभागी झालेला नाही. कारवा या सिनेमातून इरफान खान लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात मिथिला पालकर देखील दिलकर सलमानसोबत डेब्यू करत आहे. इरफान खानने या सिनेमाचा पोस्टर शेअर केला आहे.
Beginnings have the innocence that experience can't buy. My best wishes to @dulQuer , @mipalkar for joining the karwaan. ‘ Two karwaans ' .... Mine and the movie !! @MrAkvarious @RSVPMovies @RonnieScrewvala pic.twitter.com/QoKe6npkMQ
— Irrfan (@irrfank) May 16, 2018
इरफान खानचा हा सिनेमा 10 ऑगस्ट रोजी रिलीज होत आहे. इरफान खान 20 मार्च रोजी लंडनकरता रवाना झाला. याच्या काही दिवसांअगोदरच इरफान खानची तब्बेत बिघडली होती. आणि त्याला कॅन्सर असल्याच स्पष्ट झालं.