बिकीनी फोटो शेअर करताच ट्रोल झाली ही अभिनेत्री!

कुंडली भाग्य मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्रद्धा आर्याने अलिकडेच बिकिनी फोटो शेअर केला.

Updated: May 17, 2018, 03:20 PM IST
बिकीनी फोटो शेअर करताच ट्रोल झाली ही अभिनेत्री! title=

मुंबई : टी.व्ही. मालिका कुंडली भाग्य मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री श्रद्धा आर्याने अलिकडेच बिकिनी फोटो शेअर केला. पण त्यामुळे ती सोशल मीडियावर चांगलीच ट्रोल झाली. युजर्स तर कोणालाही ट्रोल करणे सोडत नाहीत. संधी मिळताच ट्रोलिंगला सुरुवात करतात. श्रद्धाने अलिकडेच इंस्टाग्रामवर बिकीनी फोटो शेअर केला पण तिचा बोल्ड अंदाज युजर्संना भावला नाही. त्यामुळे त्या फोटोवर युजर्स वाईट-साईट कमेंट्स करुन तिला ट्रोल करत आहेत.

श्रद्धाने लिहिले की...

गुलाबी रंगाच्या बिकीनीतील फोटो शेअर करत श्रद्धाने लिहिले की, सम सुपर कॅज्युअल, पूलसाईटवर शूट करताना खूप आनंदी आहे.

 

Some super casual, happy, by the poolside, shots done by my super talented bestfriend photographer @meghawadhwaphotography . Earrings: @avrachic Styling: @_oorja P.C. : @meghawadhwaphotography

A post shared by Shraddha Arya (@sarya12) on

मरत का नाहीस- ट्रोलर्सचा निशाणा..

या फोटोवर एका युजरने लिहिले की, अशा रटाळ मालिका करुन लोकांना त्रास का देतेस... त्याऐवजी मालिकेत मरत का नाहीस... तर दुसऱ्याने म्हटले की, मालिकेत तर अगदी साधीसुधी दिसतेस. आता तुझे खरे रुप समोर आले. तुमच्यासारख्या मुलींमुळेच इतर मुलीही बदनाम होतात.

 

#chillvibes  @meghawadhwaphotography

A post shared by Shraddha Arya (@sarya12) on

तर अनेकांना भावला हा अंदाज

श्रद्धाच्या या फोटोवर निगेटिव्ह कमेंट्स खूप आहेत तर दुसरीकडे चाहत्यांचीही कमी नाही. काही लोकांना तिचा हा बोल्ड अंदाज भावला. अनेकांनी तिच्या फोटोचे कौतुकही केले. सध्या आपल्या व्यस्त दिनचर्येतून वेळ काढत श्रद्धा हॉन्क-कॉन्गला सुट्टयांसाठी केली आहे.