Irrfan Khan Birthday | इरफान खानची बीसीसीआयच्या या स्पर्धेत निवड, मात्र त्यानंतरही त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय का घेतला होता?

इरफान खानचं (irrfan khan birthday) अभिनय क्षेत्रातील योगदान सर्वांनाच माहिती आहे. मात्र तो एक क्रिकेटर होता, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? 

Updated: Jan 7, 2022, 04:34 PM IST
Irrfan Khan Birthday | इरफान खानची बीसीसीआयच्या या स्पर्धेत निवड, मात्र त्यानंतरही त्याने क्रिकेट सोडण्याचा निर्णय का घेतला होता? title=

मुंबई : सिनेसृष्टीत भविष्य घडवण्यसाठी दररोज अनेक तरुण-तरुणी मुंबईत येतात. त्यापैकी काही मोजकेच यशस्वी होतात. त्यापैकी काही हे कायमचे प्रेक्षकांच्या मनात राहतात. त्यापैकी एक म्हणजे इरफान खान. इरफान खान यांचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला. मात्र ते अजूनही त्यांच्या अभिनयाच्या रुपाने प्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत. आज या महान (Irrfan Khan Birthday)आणि दिग्गज अभिनेत्याची 55 वी जयंती. इरफान खान आज आपल्यात नाहीत, मात्र तो अभिनयाच्या रुपाने प्रेक्षकांच्या मनात कायम राहिल. (irrfan khan birthday late actor irrfan khan was selected in this bcci tournament know why he decided to quit cricket)

यशस्वी अभिनेता म्हणून इरफान खान यांची सिनेसृष्टीत ख्याती होती, आहे आणि राहिल. एकसेएक जबरदस्त सिनेमा देणाऱ्या या अभिनेता होण्याआधी दुसऱ्या क्षेत्रात आपलं भविष्य घडवायचं होतं. मात्र त्याच्या नशिबात सिनेसृष्टीच होती.  

इरफान खानचं अभिनय क्षेत्रातील योगदान सर्वांनाच माहिती आहे. मात्र तो एक क्रिकेटर होता, याबाबत तुम्हाला माहिती आहे का? 

यशस्वी अभिनेता होण्याआधी इरफानचं क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतं. मात्र त्याचं हे स्वप्न अधुर राहिलं. स्वप्न अधुर राहण्याचं कारण होते ते आर्थिक.  इरफानची क्रिकेटसाठी आवश्यक असलेले 600 रुपये जमवण्याची क्षमता नव्हती. मीडिया रिपोर्टनुसार, इरफानने 2014 मध्ये टेलिग्राफला मुलाखत दिली होती.   

या मुलाखतीत इरफानने गतकाळातील आठवणींना आणि संघर्षाच्या दिवसांना उजाळा दिला. इरफानची बीसीसीआय आयोजित सीके नायडू अंडर 23 स्पर्धेसाठी निवड झाली होती. मात्र त्यानंतरही इरफानला क्रिकेटला रामराम करावा लागला होता.

रिपोर्टनुसार, "मला क्रिकेट खेळायचं होतं. माझं क्रिकेटर होण्याचं स्वप्न होतं. मी ऑलराऊंडर होतो. जयपूर टीममध्ये मी सर्वात युवा खेळाडू होतो. मला क्रिकेटमध्येच भविष्य घडवायचं होतं", असं इरफान म्हणाला होता.  

रिपोर्टनुसार, "माझी सीके नायडू स्पर्धेसाठी निवड झाली होती. पण मला तेव्हा पैशांची गरज होती. मी कोणाकडे आर्थिक मदत मागू, हे समजत नव्हतं. त्यामुळे मी क्रिकेटमध्ये करियर न करण्याचा निर्णय घेतला", असं इरफान म्हणाला होता. 

"मी त्यावेळेस 600 रुपयेही उधार मागू शकत नव्हतो. जेव्हा मला एनएसडी (National School OF Drama) 300 रुपये हवे     होते. पैशांची जुळवाजुळव करणं  शक्य नव्हतं. तेव्हा माझ्या बहिणीने मला मदत केली", असं इरफानने नमूद केलं होतं. 

"क्रिकेट सोडण्याचा निर्णय मी विचारपूर्वक घेतला होता. क्रिकेट टीममध्ये देशातून 11 खेळाडूंची निवड केली जाते. मात्र अभिनय क्षेत्रात तशी काही मर्यादा नाही. तसेच अभिनय क्षेत्रात वयाची अट नसते. जितके कठोर परिश्रम, तितकंच घवघवीत यश मिळतं", असं इरफानने म्हंटलं होतं. 

इरफानची सिनेकारकिर्द

इरफानची सिने कारकिर्द ही 3 दशकांपेक्षा अधिक होती. या मोठ्या कालावधीत त्याने छोट्या पडद्यापासून ते बॉक्स ऑफिसवर आपल्या अभिनयाची  छाप सोडली. इरफानला त्याच्या यशाचा तिळमात्र अहंकार नव्हता. 

जय हनुमान, चंद्रकांता, श्रीकांत, किरदार, जस्ट मोहब्बत यासारख्या मालिकांच्या माध्यामातून इरफान घराघरात पोहचला. तसेच पान सिंह तोमर, हिंदी मीडियम,  जुरासिक पार्क, द लंच बॉक्स यासारख्या सुपरहिट सिनेमांमधून त्याने आपल्या अभिनयाची छाप सोडली. 

इरफान खानला कॅन्सर झाला होता. मात्र कॅन्सरवर मात करत तो घरी परतला. मात्र 29 एप्रिल 2020 मध्ये त्याचा कोलन संसर्गामुळे मृत्यू झाला.