'तू हे चांगलं करशील!' मित्रासोबत इंटिमेट सीन करताना अमृता सुभाष घाबरली, तेव्हा पतीनं केलं सपोर्ट

मोस्ट अवेटिंग वेब सीरीज 'लस्ट स्टोरीज 2' नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. या वेबसिरीजमध्ये  लस्ट आणि इंटीमेसीचे खूप भरभरुन सीन्स आहेत. या वेबसिरीजमध्ये तमन्ना भाटिया, काजोल, मृणाल ठाकूर, अमृता सुभाष आणि नीना गुप्ता यांसारख्या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही वेबसिरीज तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. 

Updated: Dec 14, 2023, 12:20 PM IST
'तू हे चांगलं करशील!' मित्रासोबत इंटिमेट सीन करताना अमृता सुभाष घाबरली, तेव्हा पतीनं केलं सपोर्ट title=

मुंबई : मोस्ट अवेटिंग वेब सीरीज 'लस्ट स्टोरीज 2' नेटफ्लिक्सवर रिलीज झाली आहे. या वेबसिरीजमध्ये  लस्ट आणि इंटीमेसीचे खूप भरभरुन सीन्स आहेत. या वेबसिरीजमध्ये तमन्ना भाटिया, काजोल, मृणाल ठाकूर, अमृता सुभाष आणि नीना गुप्ता यांसारख्या अभिनेत्री महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. ही वेबसिरीज तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येईल. 
 
लस्ट स्टोरीज २ मध्ये  इंटीमेट सीन्ससाठी अभिनेत्रीच्या पतीने केलं को-एक्टरला तयार
नुकताच अभिनेत्री अमृता सुभाष नेटफ्लिक्स अभिनेता राउंडटेबलमध्ये सहभागी झाली होती. यावेळी बोलताना तिने लस्ट स्टोरी २ मधील इंटीमेट सीन्सच्या शूटिंगबद्दल सांगितलं. अमृताने याविषयी खुलासा करत सांगितलं की, तिला तिच्या को-एक्टर आणि रिअल लाईफचा सगळ्यात चांगला मित्र श्रीकांत यादवसोबत खूप सारे इंटीमेट सीन्सच्या शूटिंगबद्दल कंम्फर्टेबल होण्यासाठी कोकोला काही वेळ द्यायला मला सांगाव लागलं.  

अभिनेत्री अमृता सुभाषने केला खुलासा
अमृताने सांगितलं की, केवळ एवढंच नव्हे, इथपर्यंत होतं की, श्रीकांतदेखील इंटीमेट सीन्स देण्यासाठी खूप घाबरत होता. हा विचार करुन की, ते एकमेकांसोबत खूप चांगले मित्र आहेत. 'जेव्हा मी स्क्रिप्ट वाचली, तेव्हा त्यात खूप इंटिमेट सीन्स होते आणि मला याची भीती वाटत होती. म्हणून मी कोकोला सांगितलं की, मला श्रीकांतसोबत एक दिवस हवा आहे, जो माझा अनेक वर्षांपासून चांगला मित्र आहे.

अमृताने पुढे सांगितलं की, माझे पती त्याचे खूप चांगले मित्र आहेत आणि अभिनेताही आहे. माझे पती त्याला नेहमी सांगायचे, तु करु शकतोस, तु खूप छान प्रकारे करु शकतोस. आम्ही तुम्हाला सांगतो की, अमृताने जुलैमध्ये त्याच्या सोशल मीडियावर खूप सारे फोटो शेअर केले होते आणि कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'लस्ट स्टोरीज 2 मध्ये माझ्या पतीची भूमिका कोणी केली आहे, असं विचारणारे बरेच मेसेज मला आले. माझा जुना मित्र श्रीकांत यादवची या भूमिकेसाठी त्याचं खूप कौतुक होत आहे याचा मला खूप आनंद आहे.

अभिनेत्री आणि दिग्दर्शिका कोंकणा सेन शर्मा सध्या तिच्या 'लस्ट स्टोरीज 2' या शॉर्ट फिल्ममुळे चर्चेत आहे. कोंकणा दिग्दर्शित या वेबसिरीजला प्रेक्षकांचा खूप सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. अभिनेत्री अमृता सुभाष देखील या सिरीजचा एक भाग बनली आणि अमृताच्या अभिनयालाही प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आहे.